रिसोड ब्रह्माकुमारीज कडून महाशिवरात्री उत्साहात साजरी शिवपरमात्म्याचा दिला यथार्थ परिचय.
रिसोड ब्रह्माकुमारीज कडून महाशिवरात्री उत्साहात साजरी शिवपरमात्म्याचा दिला यथार्थ परिचय.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत ठाकूर.
------------------------------
ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री पर्वानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सकाळी विद्यालयाच्या स्थानिक शाखेतर्फे शिवध्वजारोहण करण्यात आले. ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र रिसोड संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले.ब्रह्मा कुमारी ज्योती दीदी व गीता दीदी यांच्या हस्ते केक कापुन शिवबाबाचा अवतरण दिवस साजरा करण्यात आला दीदींनी महाशिवरात्रीचे महत्व सांगितले.याप्रसंगी अवगुणमुक्त, व्यसनमुक्त, विकारमुक्त करण्यासाठी शिवप्रतिज्ञाही उपस्थितांना ब्र.कु ज्योती दीदींनी दिली. याप्रसंगी शहरातील शिवमंदिरात आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रात भगवान शंकराची प्रतिमा ठेवण्यात आली होती मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले त्यात स्वत:चा वास्तविक परिचय, परमात्म्याची दिव्य कर्तव्य, सृष्टीचक्राचे रहस्य, मृत्यूनंतर काय? मृत्यूपूर्वी काय या सारख्या विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करण्यात आलीत. ब्र.कु ज्योती दिदींनी राजयोगाची विधी आणि अनुभूतीही करविली. नागरीकांना राजयोगाच्या अभ्यास स्थानिक शाखेत विनामुल्य मिळणार असल्याचे आवाहनही आयोजकांनी या प्रसंगी केले.अतिशय आनंदमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला रिसोड शहरासह तालुक्यातील मांगूळझनक, रिठद, मांगवाडी, कंकरवाडी, बोरखेडी, सवड, गणेशपूर इत्यादी गावचे ज्ञानार्थी भाऊ बहिणी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्र. कु ज्योती दीदींच्या मार्गदर्शनाखाली ब्र. कु गीता दीदी,बीके वंदना दीदी यांच्या सह सेवा केंद्राच्या ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी विशेष सहकार्य केले.
Comments
Post a Comment