कराड नगरपालिका हद्दीमध्ये कोल्हापूर नाका ते एस.टी पोपट भाई पेट्रोल पंप ते भंगार चौक या ठिकाणावरील अंडरग्राउंड पाईप बदलणे व बंदिस्त गटारांचे काम सुरू असल्याने कराड शहरातील वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल.
कराड नगरपालिका हद्दीमध्ये कोल्हापूर नाका ते एस.टी पोपट भाई पेट्रोल पंप ते भंगार चौक या ठिकाणावरील अंडरग्राउंड पाईप बदलणे व बंदिस्त गटारांचे काम सुरू असल्याने कराड शहरातील वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कराड प्रतिनिधी
वैभव शिंदे
-----------------------------------
त्याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २७/०३/२०२४ पासून कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत कराड नगरपरिषद कराड यांचे वतीने कराड नगरपालिका हद्दीमध्ये कोल्हापूर नाका ते एस.टी पोपट भाई पेट्रोल पंप ते भंगार चौक या ठिकाणावरील अंडरग्राउंड पाईप बदलण्याचे व बंदिस्त गटाचे काम चालू करणार असले बाबत कळविले आहे. तरी कराड नगरपालिका हद्दीमध्ये अंडरग्राउंड पाईप बदलणे व बंदिस्त गटाचे काम पूर्ण होईपर्यंत कराड शहरातील वाहतुकीचे खालील प्रमाणे नियोजन होणे आवश्यक आहे.
वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल खालील प्रमाणे -
१. भेदा चौक, कराड येथून पोपट भाई पंप मार्गे पुणे व कोल्हापूर बाजूकडे जाणारे सर्व वाहने पोपट भाई पेट्रोल पंप - हॉटेल पंकज ची मागची बाजू - कराड हॉस्पिटल - कोयना मोरी मार्गे महामार्गाकडे जातील.
२. पुणे - कोल्हापूर बाजूकडून म. गांधी पुतळा, कोल्हापूर नाका मार्गे कराड शहरात प्रवेश करणारी सर्व वाहने म. गांधी पुतळा, कोल्हापूर नाका - महालक्ष्मी भंगार दुकान - पोपट भाई पेट्रोल पंप असे पूर्व बाजूचे रोडचा वापर करतील.
३. म. गांधी पुतळा, कोल्हापूर नाका ते पोपट भाई पेट्रोल पंप जाणारा पश्चिम बाजूचा रस्ता नगर पालिकेचे कामाकरिता पूर्ण पणे बंद करणेत आला आहे.
४. कोयना - मोरी कराड हॉस्पिटल ते पंकज हॉटेल मागची बाजू येथील संपूर्ण रोड हा नो - पार्किंग झोन म्हणून घोषित करणेत आला आहे.
५. शाहू चौक येथून कोल्हापूर नाका बाजूकडे जाणारी सर्व वाहने पोपट भाई पेट्रोल पंप - हॉटेल पंकज मागची बाजू कराड हॉस्पिटल - कोयना मोरी मार्गे कोल्हापूर बाजूकडे जाणारे हायवे रोडने मलकापूर, ढेबेवाडी या मार्गाचा वापर करतील.
तरी वरील वाहतूक ज्या - ज्या ठिकाणावरून वळविण्यात आले आहे. अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतूक मार्गात केलेल्या बदलासाठी सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे.
Comments
Post a Comment