सी.पी.आर. हॉस्पिटल येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा.
सी.पी.आर. हॉस्पिटल येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा.
----------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 24 मार्च हा दिवससाची प्रेरणा घेऊन सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन वैद्यकीय उपअधीक्षक सी.पी.आर, हॉस्पिटल डॉ. गिरीश कांबळे यांनी केले आहे. सी.पी. आर, हॉस्पिटल क्षयरोग डिपार्टमेंट येथे आयोजित जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
सुरुवातीला डॉ.अनिता सैबन्नावर यांनी उपस्थितांना क्षयरोग जनजागृतीपर शपथ दिली. या वेळी डॉ.रॉबर्ट कॉक यांचे फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्षयरुग्णांना सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते क्षयरुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
जिल्हा क्षयरोग आधिकारी डॉ.माधव ठाकूर प्रास्ताविक भाषणात म्हणाले कि, महान शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये बर्लिन विदयापीठात क्षयरोग टिबीसाठी कारणीभूत मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलोसिस जीवाणू शोधून काढला व त्याची माहिती लोकांसमोर जाहीर केली. या शोधामुळे क्षयरोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठीचा मार्ग सोपा झाला. त्यामुळे २४ मार्च हा दिवस जागतिक क्षययरोग दिन साजरा केला जातो..
यावेळी विभाग प्रमुख, क्षय व उरोरोग विभाग, रा.छ. शा. म. शा. वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर डॉ. अनिता अ. सैब्बनावर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.माधव ठाकूर, वैद्यकीय उपअधीक्षक सी.पी.आर, हॉस्पिटल डॉ. गिरीश कांबळे डॉ. वैद्यकीय अधिकारी पी.ए.पटेल, डॉ. नितीन कुंभार तसेच क्षयरोग विभाग व सी.पी.आर. हॉस्पीटल येथील अधिकारी व कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment