रिसोड येथील एसटी बस स्थानक मध्ये पाणपोईचे उद्घाटन.
रिसोड येथील एसटी बस स्थानक मध्ये पाणपोईचे उद्घाटन.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
------------------------------
.येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भगवानराव शिरसागर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.रिसोड शहरासह तालुक्यात ऊन तापायला सुरुवात झाली असून सर्वसामान्य जनतेची तहान भागविण्यासाठी रिसोड येथील समाजसेवक भारतआप्पा कोठुळे यांच्या संकल्पनेतून रिसोड येथील एसटी बस स्थानक व रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणपोई सुरू करण्यात आलीअसून या पाणपोईचे उद्घाटन रिसोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते भगवानराव शिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महादेव कोठुळे, नारायणराव सानप, किरण सिरसागर, उद्धवराव खरबळ यांच्यासह संकट मोचन मित्रमंडळाचे सर्व सदस्य रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व अडते, हमाल व शहरातील समाजसेवक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते..
Comments
Post a Comment