अतिरिक्त आयुक्तांनी शंभर फुटी रस्त्याबाबत लक्ष घालून सामाजिक कार्यकर्त्यांसह रस्त्याची पाहणी करावी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी.

 अतिरिक्त आयुक्तांनी शंभर फुटी रस्त्याबाबत लक्ष घालून सामाजिक कार्यकर्त्यांसह रस्त्याची पाहणी करावी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम

-------------------------------

सांगली मध्ये सुरू असलेल्या शंभर फुटी म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गाचे पंधरा कोटी पेक्षा जास्त रुपये खर्चून सुरू असलेले काम हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याच्या विरोधात लोकहित मंचाच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून आवाज उठवला जात असतानाही महापालिका प्रशासनाकडून याकडे डोळे झाक केले जात असल्याने आज ही लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी स्वतः शंभर फुटी रस्त्याचे पाहणी केली यामध्ये त्यांना रस्त्याची लेवल नसल्याचे तसेच वापरले जाणारे मटरेल दर्जेदार नसल्याचे त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारण पाच पाच फूट रस्ता खोदून ठेवलेला आहे त्यावर फुटपाथ बनवण्याची योजना असेल तर ते काम का केलं नाही असा स्वारी मनोज भिसे यांनी केला आहे शिवाय हा रस्ता अनेक ठिकाणी आरला गेल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भुसे यांनी निदर्शनास आणले आहे तर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या ड्रेनेज होलला व्यवस्थितपणे लेवल केले नसल्याने त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नव्यानेच रुजू झालेल्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सादर शंभर फुटी रस्त्याची पाहणी करून या ठिकाणची परिस्थिती जाणून घ्यावी अशी मागणी ही मनोज भिसे यांनी केले आहे..

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.