जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खडकी सदार जिल्ह्यातून प्रथम.

 जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खडकी सदार जिल्ह्यातून प्रथम.

-------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर.

-------------------------------

जिल्हा परिषद वरिष्ठ. प्राथमिक शाळा खडकी सदार केंद्र पळसखेड पं. स. रिसोड जिल्हा वाशिम या शाळेचा 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या अभियानाचे स्वरूप, विद्यार्थी केंद्रीत उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग . व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा समावेश असे होते.

शाळेला गावकऱ्यांचे खूप सहकार्य आहे. या शैक्षणिक वर्षांमध्ये नव्याने सुरू झालेल्या,  *'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा'*  अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या,या अभियानामध्ये शाळेची केंद्र- तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर 100 गुणांची  विविध पथकाकडून तपासणी केली गेली. या तपासणीमध्ये  विद्यार्थ्या मार्फत वर्गसजावट, शालेय परिसर , शालेय इमारत व परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण व संवर्धन,  परसबाग, विद्यार्थी मंत्रिमंडळ, शालेय विद्यार्थी बचत बँक ,भौतिक सुविधा, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेसाठी राबविलेले विविध उपक्रम, आर्थिक साक्षरता, व्यवसाय मार्गदर्शन व कौशल्य विकास, लहान वयातील वाढते आजार व प्रतिबंधात्मक उपाय, यासाठी राबवलेले उपक्रम. माजी विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती शालेय सहभाग, लोकसहभाग, तंबाखु मुक्त  - प्लॅस्टिक मुक्त  शाळा यासाठी राबवलेले उपक्रम. स्थानिक सेवाभावी संस्थेचा शाळा विकासासाठी सहभाग, स्वच्छता मॉनिटर उपक्रम, नवभारत साक्षरता अभियान शाळेचा सहभाग, या सर्व  विषयांवर तपासणी केली . वाशिम जिल्ह्यातून मूल्यांकनासाठी आलेल्या  जिल्हास्तरीय समितीने वरील मुद्द्यांच्या आधारे शाळेची तपासणी केली. या सर्व मुद्द्यांमध्ये शाळेने अव्वल स्थान पटकावले. जिल्हा परिषद(local body) व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये वाशिम जिल्ह्यामधुन प्रथम क्रमांक आला आहे.मूल्यांकन समितीने शाळेचे, शाळा व्यवस्थापन समितीचे मुख्याध्यापकांचे शिक्षकांचे कौतुक केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेला मिळालेल्या या यशामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. किरणताई गजानन सदार उपाध्यक्ष श्री अरविंद सदार व सर्व सदस्य यांचा सिंहाचा वाट आहे तसेच सर्व गावकऱ्याशिवाय हे शक्य नव्हते असे शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास मानवतकर सर यांनी सांगितले. पळसखेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संतोष भिसडे सर त्याचप्रमाणे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी आ.श्री बद्रीनारायण कोकाटे साहेब यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली यामध्ये मुख्याध्यापक श्री कैलास मानवतकर सर, भावना दागडीया मॅडम, दिलीप गाडे सर, साईनाथ शिंदे सर, रंगनाथ गव्हाणे सर व महेश जिरवणकर सर यांनी अथक परिश्रम घेतले अशा प्रकारे  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खडकी सदार शाळेचे व विद्यार्थ्याचे तालुक्यातून, जिल्ह्यातून व पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.