अवकाळी पावसाने जावळीत घेतला बळी.

 अवकाळी पावसाने जावळीत घेतला बळी.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

 मेढा प्रतिनिधी 

प्रमोद पंडीत

----------------------------------

सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे . शेतीच्या चालु हंगामात शेतकरी शेतीत ज्वारी काढण्यात मग्न आहेत काल सायंकाळ च्या सुमारास ढंगाचया गडगडाटासह विजाचा कडकडाटात पावसाला सुरुवात झाली त्या दरम्यान शेतात ज्वारी काढत असताना अंगावर वीज पडून जावली तालुक्यातील आलेवाडी शिवारात गणेश जगन्नाथ दुटाळ रा आतेवाडी वय - ३४ वर्षे यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या धक्कादायक घटनेमुळे दुटाळ परिवारासह आलेवाडी गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे . घरातील कर्ता पुरुष म्हणून गणेश दुटाळ हे कुटुबाचा सभाळ करत होते .

कालदुपारी ते शेतात आपल्या कुटुंबासमवेत ज्वारी काढत असताना अचानक ढगाळ वातावरण होऊन विजाच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली यावेळी शेतात ज्वारी काढत असणाऱ्या गणेश दुटाळ यांच्या अंगावर वीज कोसलली या मध्ये ते गंभीर स्वरूपात भाजले व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला

या आपघाताची माहिती मिळताच घटना स्थळावर महसुल विभागांचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी दाखल झाले त्यांचा पंचनामा करून त्याचा अपघाती मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे तसेच सध्या जिल्हासर जावळी तालुक्यातील वातावरण बदलले असून विजांच्या कडकडाटासह आवकाळी पाऊस होत आहे यांतच शेतीची कामे शेवटच्या टप्प्यात आली असून शेतकऱ्यांची धवपळ सुरू झाली आहे तरी सर्व शेतकऱ्यानी वातारणाचा अंदाज घेवून घराबाहेर पडावे व काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे ।

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.