खा. संजय राऊत यांनी काँग्रेसविषयी वापरलेले अपशब्द मागे घ्यावेत : नंदकुमार कुंभार
खा. संजय राऊत यांनी काँग्रेसविषयी वापरलेले अपशब्द मागे घ्यावेत : नंदकुमार कुंभार
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
इस्लामपूर प्रतिनिधी
काँग्रेसची माफी मागावी ; विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी .
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी संयमाने बोलावे . सांगलीची जागा शंभर टक्के शिवसेनेला मिळाली आहे. कुणाला भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काय साध्य करायचे आहे माहित नाही असे खा. संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर बोलले होते. खा . राऊत यांच्या वक्तव्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेस दुखावली आहे. त्यामुळे खा.राऊत यांनी काँग्रेस विषयी वापरलेले अपशब्द मागे घ्यावे व काँग्रेस ची माफी मागावी अशी मागणी
काँग्रेसचे प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांनी केली आहे.
कुंभार म्हणाले , महाविकास आघाडी लोकसभेचे उमेदवार ठरवत असताना आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन उमेदवारी जाहीर करायची आहे . तसे न करता शिवसेनेने सांगली लोकसभा उमेदवारी जाहीर करून या मतदारसंघांमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे विद्यमान दोन आमदार आहेत. स्व. वसंतदादा पाटील , स्व. पतंगराव कदम , स्व. आर आर पाटील यांचे विचार तळाग
Comments
Post a Comment