कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे धाबे दणाणले.

 कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे धाबे दणाणले.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार.

----------------------------------

 कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या अखत्यारीत 42 गावांचा समावेश करण्यात आला होता

या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या अखत्यारीत वळीवडे चिंचवाड उंचगाव गडमुडशींगी गांधीनगर या ग्रामपंचायत पण येतात वरील ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकामे सुरु असून त्यां बांधकामावर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर आर्थिक लाभापोटी नुसते पंचनामा करण्या व्यतिरिक्त काहीच केलेले नाही अनेक सामाजिक संघटनांनी कार्यकर्त्यानी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या कडे बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत.

तक्रार दाखल झाल्यानंतर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाने पंचनामा करून फाईल कपाटात ठेवून दिल्या.अन ज्या बांधकामावर कारवाई करुन स्थळी पाहणी पंचनामे केले त्या बेकायदेशीर बांधकामे पूर्ण होऊन मोठ्या दिमाखात बेकायदेशीर बांधकाम धारकांनी आपले व्यवसाय सुरू केले असल्याचे चित्र दिसत आहे यावर अनिल हेगडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला इशारा दिल्यानंतर 100 पेक्षा आधीक बेकायदेशीर बांधकामे चालू असून त्यापैकी फक्त दोनच बेकायदेशीर बांधकाम धारकावर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांनी फौजदारी गुन्हे गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत 

या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कामकाजास कंटाळून सामाजिक कार्यकर्ते ओंकार गायकवाड यांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर किंवा जिल्हाधीकारी कोल्हापूर यांच्या दालनासमोर दि 27/03/24 आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे बेकायदेशीर बांधकाम धारक व कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांचे धाबे दणाणले आहेत

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.