प्राणी मित्र जखमी त्याला आर्थिक मदतीची गरज .

 प्राणी मित्र जखमी  त्याला आर्थिक मदतीची गरज .

-----------------------

हुपरी प्रतिनिधी

जितेंद्र जाधव

-----------------------

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील रहिवाशी पप्पू खोत हे एक प्राणी मित्र सर्पमित्र आहेत. शेकडो विषारी बिनविषारी सापांना जीवदान देणारे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे तसेच त्यांची गावांमध्ये सर्पमित्र म्हणून ओळखळे जाणारे सर्वांच्या हाकेला धावणारा असा हा प्राणी मित्र सर्पमित्र आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळण्यासाठी झाडावरून नारळ काढून देण्याचा व्यवसाय करतात झाडावरून नारळ काढत असताना ते 40 फूट उंच नारळाच्या झाडावरून पडून जखमी झाले आहेत खोत यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे त्यांची दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत छातीला व मणक्याला दुखापत झाली आहे घरची परिस्थिती हालाखीची आहे घरी वयस्कर आई आजारी वडील पत्नी आणि दोन लहान मुले आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला मिळेल ते काम करणाऱ्या पप्पू वर काळाने घाव घातला आहे हसत खेळत चालणाऱ्या व मुख्य प्राण्याची सेवा करणाऱ्या होतकरू कुटुंबावर वाईट प्रसंग आला आहे

आत्ता पप्पू खोत यांना वैद्यकीय उपचारासाठी मदतीची आवश्यकता आहे समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात पुढे करावा  अशी खोत-कुटुंबीयानी विनंती केली आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.