नागाव फाटा येथे वाहतुकीची कोंडी वाढली ठोस उपाय करणेची मागणी.

 नागाव फाटा येथे वाहतुकीची कोंडी वाढली ठोस उपाय करणेची मागणी.

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

--------------------------------------------

सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ब्रिज चे काम प्राधान्याने सुरू आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेथे ब्रिज चे काम सुरू आहे,त्याठिकाणची वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहे. त्याचबरोबर मुख्य हायवे व सेवा रस्ता रुंदीकरणाचे कामही सुरू आहे.खासकरून सांगली फाटा ते शिये फाटा या परिसरात सेवा रस्त्याची रुंदी खडीकरण करून सपाटीकरण करून वाढविण्यात आली आहे. या सेवा रस्यावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू आहे. या भागातील शोरूम,ट्रान्सपोर्ट, मार्बल ,फर्निचर दुकाने या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठी आहे.विशेषतः सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत हा रस्ता शिरोली एम आय डी सी तील कंपन्याची जनरल शिफ्ट सुटल्यांतर नागाव फाटा येथील चौकात चारही बाजूनी वाहने येत असल्याने वाहतुकीची रोजच कोंडी होत आहे.तसेच रस्ता आखूड झाल्याने ट्रॅफिक जाम वारंवार होत आहे.सायंकाळी एम आय डी सी सुटल्यानंतर शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांस,पादचाऱ्यांना चालत जाणेही मुश्कील झाले आहे.तसेच सेवा रस्त्यावर सर्वत्र खडी विस्कटलेली आहे.यामुळे गाडी स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. सायंकाळी रहदारीच्या वेळी तरी शिरोली एम आय डी पोलिसांनी किंवा हायवे पोलिसांनी वाहतूक नियंत्रक नेमावा,जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल,अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांच्यातून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.