बिबट्या आणि त्याच्या दोन पिलांचा मुक्त संचार गावकरी धास्तावले.
बिबट्या आणि त्याच्या दोन पिलांचा मुक्त संचार गावकरी धास्तावले.
------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
------------------------
मेढा :- मालचौंडी ता.जावली आणि परिसरामध्ये बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा रात्रीच्या सुमारास गावातून मुक्त संचार होत असून गावातील आतापर्यंत तीन पाळीव कुत्र्यांवरती हल्ला केलेला आहे.त्यात तिन्ही पाळीव कुत्रे मृत्युमुखी पडलेले आहेत तसेच बऱ्याच जनावरांच्या गोठ्यावरती सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. बिबट्याच्या आणि पिल्लांच्या या मुक्त संचाराने गावकरी पूर्ण धास्तावले असून त्याच्या या दहशतीमुळे गावामध्ये व आजुबाजुच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्मान झाले आहे. बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा वन विभागाने काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून व पंचक्रोशितुन होत आहे.वारंवार तक्रार देऊ नये याच्याकडे कानाडोळा केलाजात आहे जात आहे .काहीतरी उचीत प्रकार घडण्याच्या अगोदर वनविभागाणे लक्ष घालनेगरजेचे आहे.अशिप्रतिक्रिया जावली विभागातुन येत आहे
Comments
Post a Comment