जावळीतील आर्डे सोसायटीची वसुली १०० % पूर्ण
जावळीतील आर्डे सोसायटीची वसुली १०० % पूर्ण.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
शेखर जाधव
------------------------------------
जावली तालुक्यातील आर्डे विकास सोसायटी ची बॅक पातळीवर १००% वसुली झाली आहे.
आर्डे विकास सोसायटीत सभासद 329 आहेत जावली तालुक्यात बँक पातळीवर १००% वसुली होण्याचा पहिला मान आर्डे विकास सोसायटी ने पटकवला आहे त्याबद्दल सोसायटीचे चेअरमन आनंद एकनाथ ससाने ,व्हाईस चेअरमन रमेश रघुनाथ जाधव व सर्व संचालक मंडळ व सभासद यांचे सहकार्य लाभले .
विशेष म्हणजे आर्डे विकास सोसायटी चे सचिव श्री.अनिल ससाणे यांच्या परिश्रमामुळे सोसायटी ची शंभर टक्के वसुली झाल्याची चर्चा सभासद करीत आहेत सचिव अनिल ससाणे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जावळीचे सहाय्यक निबंधक एन के रूपनवर साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी सहाय्यक निबंधक रूपनवर साहेब म्हणाले कामात कार्यतत्पर असलेले सचिव अनिल ससाणे यांचा आदर्श सर्व सचिवांनी घ्यावा सोसायटीचे वसुली कामी प्रोत्साहन ,मदत करणारे विभागिय विकास अधिकारी अण्णासाहेब फरांदे साहेब,विकास अधिकारी दीपक पार्टे साहेब, वसुली अधिकारी संजय निकम साहेब ,अनिल ससाने यांचे जिवलग मित्र मनोज देशमाने यांची मोलाची साथ मिळाली मार्च महिन्याच्या अगोदरच शंभर टक्के वसुली झाल्याबद्दल सचिव अनिल ससाने यांचे जावली तालुका तालुक्यातील सर्व गट सचिवांनी अभिनंदन केले
फोटो :- सचिव अनिल ससाने यांचा सत्कार करताना सहाय्यक निबंधक नानासाहेब रुपनवर व इतर मान्यवर
( )
Comments
Post a Comment