सुळकूड योजनेबाबत नागरीकांकडून सूचना नोंदविणेकरीता १४ दिवसांचा कालावधी.

 सुळकूड योजनेबाबत नागरीकांकडून सूचना नोंदविणेकरीता १४ दिवसांचा कालावधी.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

--------------------------------

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय.

कोल्हापूर, दि. १२ : केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत मंजूर इचलकरंजी शहर पाणीपुरवठा प्रकल्प (सुळकूड योजना) बाबतची बैठक मा. मुख्यमंत्री महोदय यांचेकड़े दि. ०१ मार्च, २०२४ रोजी पार पडली होती. त्या बैठकीतील निर्देशानूसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून समितीची पहिली बैठक १२ मार्च, २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पार पडली. या बैठकीस इचलकरंजी म.न.पा., पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इ. विभागांचे अधिकारी तसेच इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती, दुधगंगा बचाव कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदय यांचेकडील दि. ०१ मार्च, २०२४ रोजीच्या बैठकीतील निर्देशानुसार योजनेबाबत नागरीकांकडून सूचना नोंदविणेकरीता दि. २६/०३/२०२४ पर्यंत १४ दिवसांचा कालावधी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरीकांना उक्त योजनेच्या अनुषंगाने लेखी सूचना दाखल करता येतील. उक्त योजनेच्या अनुषंगाने नागरीकांना सूचना दाखल करणे सोयीचे व्हावे याकरीता उपविभागीय अधिकारी कार्यालय, इचलकरंजी उपविभाग इचलकरंजी, तहसील कार्यालय, कागल या ठिकाणी तसेच कार्या. ११, नगरपरिषद प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर या ०३ कार्यालयांपैकी कोणत्याही ०१ कार्यालयात सूचना लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत दाखल करता येतील. तसेच याकामी तांत्रिक गटाची नेमणूक करण्यात आलेली असून नागरीकांकडून आलेल्या सूचना तसेच योजनेच्या तांत्रिक बाबी तपासून तांत्रिक गटाकडून अहवाल सादर करण्यात येईल. तदनंतर जिल्हास्तरीय समितीमध्ये त्याबाबत विचारविनिमय होऊन अंतिम अहवाल शासनाकड़े सादर केला जाणार आहे. तरी संबंधित नागरीकांनी उक्त नमूद कार्यालयांमध्ये विहीत कालावधीत सूचना नोंद करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन नागेंद्र मुतकेकर सह आयुक्त कोल्हापूर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.