‘किसन वीर’मधील एन.एस.एस. व एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांचा पोलिओ लसिकरणात सहभाग.
‘किसन वीर’मधील एन.एस.एस. व एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांचा पोलिओ लसिकरणात सहभाग.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यांनी वाई शहरातील विविध केंद्रांवर राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानात सहभाग घेऊन स्वयंसेवक व छात्रांनी, या अभियानात आपले योगदान दिले. या राष्ट्रीय व समाजोपयोगी कामातून समाधान मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.
रविवार दि. ०३ मार्च २०२४ रोजी देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान राबविण्यात आले. त्याचाच भाग म्हणून, वाई ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनेही वाई शहरामध्ये हे अभियान राबविले गेले. याकामी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यांनी मदत करावी अशी ईच्छा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली होती. या आवाहनास महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी लगेच मान्यता दिली व दोन्ही विभागांना कार्यवाहीचे आदेश दिले. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, कॅप्ट. डॉ. समीर पवार व डॉ. अंबादास सकट यांनी त्याचे नेटके नियोजन केले. या राष्ट्रीय कामात विद्यार्थ्यांनी पाच वर्षाआतील बालकांना पोलिओ डोस देऊन, त्यांच्या बोटावर लसिकरणाचे निशाण लावले. तसेच यादीत बाळाचे नाव, पत्ता व जन्मतारीख नोंदवून पालकांनाही मदत केली. वाई शहरातील घरा-घरात जाऊन बालकांना लसिकरण मोहिमेत सामील होण्याबाबत पालकांना निरोप दिला.
सदर विद्यार्थ्यांचे नेत्रचिकित्सा अधिकारी विठ्ठल भोईटे, आरोग्य निरीक्षक विठ्ठल पोळ, ग्रामीण रुग्णालयाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांचे मार्गदर्शन व पाठबळ मिळाले पोलिओ लसिकरण करताना एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, एन.एस.एस. , एन.सी.सी. चे स्वयंसेवक, छात्र व ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी छात्र यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment