वाघवे पैकी कुराडवाडी (ता.पन्हाळा) येथील सौ.शांताबाई बंडोपंत गायकवाड (वय ६२ वर्ष) यांच्यावर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये मेंदूवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
वाघवे पैकी कुराडवाडी (ता.पन्हाळा) येथील सौ.शांताबाई बंडोपंत गायकवाड (वय ६२ वर्ष) यांच्यावर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये मेंदूवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
----------------------------------
पन्हाळा तालुक्यातील वाघवे पैकी कुराडवाडी गावचे रहिवासी श्री.बंडोपंत गायकवाड यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची वारणानगर येथे भेट घेऊन आपल्या पत्नीच्या आजारपणाची व्यथा मांडली होती. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सौ.शांताबाई बंडोपंत गायकवाड यांच्या मेंदूवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १६ लाख ५० रु.अपेक्षित खर्च येणार होता. आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोन वरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले.
आज वारणानगर येथे जनसंपर्क कार्यालयात सौ.शांताबाई बंडोपंत गायकवाड यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची भेट घेतली. आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पांडुरंग गायकवाड,तुकाराम गायकवाड,बंडोपंत गायकवाड,दत्तात्रय गायकवाड,सागर गायकवाड,विठ्ठल पाटील,अजिंक्य गायकवाड,अशोक माने,स्वप्निल माने,संजय बंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment