विविध गुन्ह्यातून फरारी असलेल्या सात आरोपीसह दोन विधी संघर्ष बालक स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या ताब्यात.
विविध गुन्ह्यातून फरारी असलेल्या सात आरोपीसह दोन विधी संघर्ष बालक स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या ताब्यात.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------
कोल्हापूर :- येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे सह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता.
सदर मोहिमेमध्ये भुदरगड पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि न.१५/२०२३ भा .द.वी.स. कलम ४१९,४२०, ३१२, ३१५, २०१, ३४ सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ सह वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे कलम ३, ४, ५, सह महाराष्ट्र सुश्रुषा गृह कायदा १९४९ चे कलम ५,६ या दाखल गुन्हयामधील आरोपी १ ) युवराज आनंदा कांबळे रा.माळभाग दुर्गेवाडी ता.हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, २) बाळासाहेब पुडंलिक पाटील रा. सांगरुळ ता. करवीर जिल्हा कोल्हापूर, ३) कुंतीनाथ आप्पासो चौगले, वय ४९ रा. अकीवाट ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे आरोपी गेल्या फरारी होते.
तसेच करवीर पोलीस ठाणे गुन्हा रजि. न. २२/२०१८ भा.द.वी.स कलम ४०६, ४१९, ४२०,४६५,४६७,४६८, ४७१ या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी ४ ) सुरेश संभाजी पाटील वय - ३८ रा. बाकरे ता. करवीर जिल्हा कोल्हापूर हे स्वतःचे अस्तित्व लपवून फरारी होते
त्याचप्रमाणे वडगांव पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि न.०७/२०१२ भा.द.वी.स कलम ३७९, ३४ या गुन्हयातील आरोपी ५) लखन रतन नवले, वय ३३ रा. नागोबावाडी पेठवडगांव ता. हातणकंगले तसेच वडगांव पोलीस ठाणे गुन्हा रजि न. १११/२०२१३ भा.द.वी.स. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ या गुन्हयातील आरोपी ६) गणेश रतन नवले, वय ३५ रा. नागोबावाडी पेठवडगांव ता. हातणकंगले हे गेल्या १० वर्षा पासुन फरारी होते.
कोडोली पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि न. १५६/२०१९ भा.द.वी.स. कलम ३९२, ४१३, ४१४, ३४ सह मोका ३ ( i ) (i), ३(२), ३(४), ३(५) या दाखल गुन्हयातील आरोपी ७ ) आप्पा उर्फ सुभाष माने, रा. तामसेडवाडी ता.माळशिरस जिल्हा सोलापूर हा आरोपी ४ वर्षा पासुन फरारी होता
लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे गुन्हा रजि न. ३२१/२०२३ भादवी कलम १४३, १४७, १४८,४२७ मपोका १३५ या गुन्हयातील दोन विधीसंघर्षग्रस्त बालक हे सदरचा गुन्हा घडले पासुन सापडत नव्हते.
वर नमुद सात आरोपीचे व दोन विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांचे ठाव ठिकाण्याबाबत पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त करुन त्याना ताब्यात घेवुन संबधीत पोलीस ठाणेकडे हस्तातंरित केले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे-पाटील व श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर व श्रेणी पोलीस उप निरीक्षक अजित गोडबोले, पोलीस अमंलदार संजय पडवळ, संतोष पाटील, सचिन देसाई, प्रकाश पाटील, रणजित पाटील, अमर आडुळकर, ओंकार परब, आयुब गडकरी, अमर शिरढोणे यांनी केलेली आहे.
Comments
Post a Comment