ब्रह्माकुमारीज रिसोडच्या वतीने दादी गुलजार यांना श्रद्धांजली.

 ब्रह्माकुमारीज रिसोडच्या वतीने दादी गुलजार यांना श्रद्धांजली.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

--------------------------------

प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोड च्या वतीने ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका गुलजार दादी यांना 11 मार्च त्यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. रिसोड सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी दादीना श्रद्धांजली देताना त्यांच्या जीवनातील संस्थेच्या संबंधित अविस्मरणीय व अलौकिक कार्याला उजाळा दिला.राजयोगाचा अभ्यास,सात्विक खानपान व संयमीत दिनचर्या ही शिवबाबाची शिकवण ब्रह्माबाबा व गुलजार दादीच्या माध्यमातून सर्वाना दिली.केवळ आठ वर्ष वय असताना ओम मंडळी शी जुडून दादी बाबाची सर्वात लाडकी बनली होती.आपल्या 92 वर्षाच्या जीवनात चोवीस पेक्षा जास्त देशात जाऊन ईश्वरीय सेवा देण्याचे अतुलनीय कार्य केले.व आपल्या शरीराला परमात्म्याचा रथ म्हणून निमित्त बनविले.आणि दादी गुलजार यांनी उच्चारीत केलेल्या महावाक्याचे पठण केले.त्यांनी केलेली सेवा ही ईश्वरीय परिवाराला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे मनोगत बी के ज्योती दिदि यांनी व्यक्त केले.बी.के ज्योती दीदी, गीता दीदी सह उपस्थित सर्व ज्ञानार्थी भाऊ बहिणीनी दादी गुलजार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून श्रद्धांजली दिली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.