अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सेमाडोह जवळ एसटी बस दरीत कोसळली, २ मृत्यू व 25 जखमी.

 अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सेमाडोह जवळ एसटी बस दरीत कोसळली, २ मृत्यू व 25 जखमी.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी एन देशमुख

-----------------------------------------

अमरावती येथून निघालेल्या परतवाडा आग्रहाची एसटी बस एम एच ०७सी९४७८ क्रमांकाची परतवाडा घटना हा अपघात घडला. रविवार आज सकाळी ११.३० वाजता जवाहर कुंड येथे घाट वळणावर अचानक चालकाकडून एसटी बसअनियंत्रित झाल्याने३० फुट खोल दरी कोसळली. त्या दोन महिला ठार झाल्या तर २५ 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजीकच्या सीमा डॉ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ईंदू समाधान गंत्रे वय ६५(रा. साठ मोरी ता. खकणार मध्य प्रदेश व ललिता चिमोटे वय 30 बुरडघाट अशी मृतांची नावे असून त्यांचे मृतदेह एस टी मध्येच आहेत. आरोग्य यंत्रणेच्या वतीने तात्काळ जखमींना रुग्णवाहिका द्वारे सीमा डॉ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ता तथा उपसरपंच राजेश सेमलकर ,ओम प्रकाश तिवारी ,सुनील येवले ,शिवा काकड ,प्रदीप सेमलकर, लाला काददेकर, बाबू दहीकर असे सेमाडोह धारणी रोड येथील अनेक जण मदतीला धावले असून घटनास्थळी चिखलदरा पोलीस मदती करता पोहोचले आहेत. एस टी महामंडळाचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत. अशी माहिती परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखडे यांनी दिली. परतवाडा आगाराची चे एम एच०७सी९४७८ एसटी बस क्रमांक परतवाडा घटांग सेमाडोह धारणी तुकाई थर्ड जात असताना हा अपघात झाला.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.