Posts

Showing posts from March, 2024

लोहा वळण रस्त्यालगत आयशर उलटला ; वाहनाचे आणि द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान.

Image
  लोहा वळण रस्त्यालगत आयशर उलटला ; वाहनाचे आणि द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनीधी  अंबादास पवार  ---------------------------------             मागील दोन ते तीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे रस्ता काम सुरू असून लोहा शहरातील नांदेड ते लातूर महामार्गावरील लोहा वळण रस्त्याचे अर्धे काम पूर्ण झाले, मात्र अर्धे काम ठप्प पडल्याने लातूर कडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना उड्डाण पुलावरून जायचे का सर्व्हिस रस्त्याने जायचे हे समजण्या अगोदरच समोर ठेवलेल्या बॅरीकेटवर किंवा बाजूला वाहने उलटून अपघात होत असल्याचे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. सांगली जिल्ह्यातून नागपूर कडे द्राक्ष घेवून जाणाऱ्या आयचर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने तो समोरील बॅरीकेटवर अदळण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला उलटला. अयचार मधील द्राक्षे रस्त्यालगत शेतात विखुरल्याने वाहनासह द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने आयशर मधील दोनही चालक बालंबाल बचावले. सदरील घटना दि. ३१ मार्च रोजी रविवारी पहाटे साडेपाच वाजता घडली.                

संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार.

Image
  संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर ---------------------------------- पळसखेड येथील लेकबाळ उषाबाई अशोकराव मुटकुळे बाभुळगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी यांची कन्या कु कोमल हिने बिग एच एम एस मध्ये नाशिक युनिव्हर्सिटी गुरु मिसरी कॉलेज मेडिकल कॉलेज सेलगाव जिल्हा जालना मुली मधून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पळसखेडा गावकरी त्याचा संभाजी ब्रिगेड वाशिम च्या वतीने अशोकराव मुटकुळे तसेच उषाबाई मुटकुळे यांचा रुमाल टोपी शिवाजी महाराज यांची प्रतिमा तसेच उषाबाई खरात यांचा साडीचोळी देऊन गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात पळसखेड येथील प्रतिष्ठित नागरिक अश्रुबा खरात माणिकरावजी गव्हाणे युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष राजूभाऊ खरात रामेश्वर जी खरात अनिकेत खरात ज्ञानेश्वर खरात संजय खरात संजय खडसे अंकुश खरात संतोष खरात सखारामजी शिंदे बबनराव खरात नामदेव कोंघे गोपाल खरात सुरज खराततसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अलकाताई खरात मंदाताई खरात अंजू ताई खरात मीनाताई खरात रूपालीताई

मंगळवार पेठ चर्च तर्फे ईस्टर निमित्त भव्य रॅली.

Image
  मंगळवार पेठ चर्च तर्फे ईस्टर निमित्त भव्य रॅली. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम ---------------------------------- मिरज. सुमारे 2024 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपले रक्त वाहिले या दिवसाला गुड फ्रायडे असे म्हणतात व तिसऱ्या दिवशी थडग्यातून त्यांचे पुनरुत्थान झाले म्हणजेच ते तिसऱ्या दिवशी मेलेल्या मधून पुन्हा जिवंत झाले याच दिवसाला ईस्टर असे म्हणतात. अशी माहिती मंगळवार पेठ चर्चेचे प्रमुख रे वरंट श्रीनिवास चोपडे यांनी दिली. मिस्टर निर्मित मंगळवार पेठ चर्च तर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले मंगळवार पेठ चर्च पासून ते मिरज मार्केट पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीच्या आग्रह भागी चर्च चे फादर रेवरंट श्रीनिवास चोपडे आपल्या अनुयायासह होते या रेल्वेमध्ये सुमारे 200 पेक्षा जास्त ख्रिश्चन बांधवांनी सहभाग घेतला होता रॅलीच्या अग्रभागी ट्रॅक्टरवर येशू ख्रिस्तांचा भव्य फलक होता...

निसर्गप्रेमी माणिक ग्रुप तर्फे रस्त्याचे स्वच्छता.

Image
  निसर्गप्रेमी माणिक ग्रुप तर्फे रस्त्याचे स्वच्छता. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम ----------------------------------- मिरज. येथील जागरूक असणाऱ्या निसर्गप्रेमी मॉर्निंग ग्रुपच्या काही सदस्यांनी ऑक्सिजन पार्क रोडवरील कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली व संपूर्ण रस्त्याचे स्वच्छता श्रमदानाने केली त्यामध्ये प्रमुख्याने नंदकिशोर ओझा तानाजी ओमाशे योगेश मगदूम धनंजय चिखले संजय कुंभोज सूर्यकांत शिंदे दिलीप चौगुले सौदागर साहेब बट सर व चप्पल कट्टी सराफ यांचा समावेश होता मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केलेल्या व राबवलेल्या स्वच्छता अभियाना बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे रस्त्याच्या बाजूची झाडे जगली पाहिजेत लहान लोकांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांनी एक बाटली पाणी आणून झाडांना घातले पाहिजे असे मत ओम साई योग क्लासेस चे संचालिका मीनाक्षी फडके यांनी व्यक्त केले...

प्राणी मित्र जखमी त्याला आर्थिक मदतीची गरज .

Image
  प्राणी मित्र जखमी  त्याला आर्थिक मदतीची गरज . ----------------------- हुपरी प्रतिनिधी जितेंद्र जाधव ----------------------- हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील रहिवाशी पप्पू खोत हे एक प्राणी मित्र सर्पमित्र आहेत. शेकडो विषारी बिनविषारी सापांना जीवदान देणारे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे तसेच त्यांची गावांमध्ये सर्पमित्र म्हणून ओळखळे जाणारे सर्वांच्या हाकेला धावणारा असा हा प्राणी मित्र सर्पमित्र आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळण्यासाठी झाडावरून नारळ काढून देण्याचा व्यवसाय करतात झाडावरून नारळ काढत असताना ते 40 फूट उंच नारळाच्या झाडावरून पडून जखमी झाले आहेत खोत यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे त्यांची दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत छातीला व मणक्याला दुखापत झाली आहे घरची परिस्थिती हालाखीची आहे घरी वयस्कर आई आजारी वडील पत्नी आणि दोन लहान मुले आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला मिळेल ते काम करणाऱ्या पप्पू वर काळाने घाव घातला आहे हसत खेळत चालणाऱ्या व मुख्य प्राण्याची सेवा करणाऱ्या होतकरू कुटुंबावर वाईट प्रसंग आला आहे आत्ता पप्पू खोत यांना वैद्यकीय उपचारासाठी

अवकाळी पावसाने जावळीत घेतला बळी.

Image
  अवकाळी पावसाने जावळीत घेतला बळी. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मेढा प्रतिनिधी  प्रमोद पंडीत ---------------------------------- सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे . शेतीच्या चालु हंगामात शेतकरी शेतीत ज्वारी काढण्यात मग्न आहेत काल सायंकाळ च्या सुमारास ढंगाचया गडगडाटासह विजाचा कडकडाटात पावसाला सुरुवात झाली त्या दरम्यान शेतात ज्वारी काढत असताना अंगावर वीज पडून जावली तालुक्यातील आलेवाडी शिवारात गणेश जगन्नाथ दुटाळ रा आतेवाडी वय - ३४ वर्षे यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या धक्कादायक घटनेमुळे दुटाळ परिवारासह आलेवाडी गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे . घरातील कर्ता पुरुष म्हणून गणेश दुटाळ हे कुटुबाचा सभाळ करत होते . कालदुपारी ते शेतात आपल्या कुटुंबासमवेत ज्वारी काढत असताना अचानक ढगाळ वातावरण होऊन विजाच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली यावेळी शेतात ज्वारी काढत असणाऱ्या गणेश दुटाळ यांच्या अंगावर वीज कोसलली या मध्ये ते गंभीर स्वरूपात भाजले व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला या आपघाताची माहिती मिळताच घटना स्थळावर महसुल विभागांचे कर्म

कृषी प्रधान सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना.

Image
  कृषी प्रधान सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   लोहा प्रतिनिधी  अंबादास पवार  -------------------------------  महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेती करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी लोहा तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी गट समूहाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग आत्मा अंतर्गत तालुक्यातील २५ सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या शेतकरी गटाला प्रधान्य देण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात आली असुन सदरील कंपनीच्या संचालक मंडळाची निवड लोहा तालुका कृषी अधिकारी पोटपेलवार आत्माचे बिटीएम सोहेल सय्यद यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी कृषीप्रधान शेतकरी सेंद्रिय शेती उत्पादक कंपनीच्या अध्यक्षपदी रत्नाकर पाटील ढगे तर उपाध्यक्षपदी देविदास मोरे यांची निवड करण्यात आली यावेळी गटातील शेतकरी व कंपनी चे संचालक रत्नाकर पाटील ढगे, देविदास मोरे ,सरपंच हिरामन मोरे,रामेश्वर पवार, आनंद जाधव, ज्ञानोबा येवले, सुनील मोरे, चैताली मोरे, आमृतराव मोरे, पत्रकार गणपत जामगे यांची उपस्थिती होती यावेळी बॅक व्यवहाराकरिता सरपंच हिरामन मोरे व आनंद जाधव या

भोगावती साखर कारखान्याला 2032 टन ऊस नेल्याबद्दल धनाजी पाटील कौल वकर याला प्रथम क्रमांक.

Image
भोगावती साखर कारखान्याला 2032 टन ऊस नेल्याबद्दल धनाजी पाटील कौल वकर याला प्रथम क्रमांक. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------ राधानगरी तालुक्यातील कथे वाडी येथील प्रगतशीर शेतकरी धनाजी पाटील कौल व कर याने भोगावती साखर कारखान्याला यावर्षी भागातील ऊस ट्रॅक्टर दारे घालवल्याबद्दल प्रथम क्रमांक पटकावला आहे कथेवाडी येथील प्रगतशील शेतकरी धनाजी पाटील कौल व कर यांनी आपल्या भागातील ट्रॅक्टर द्वारे ऊस चालू गळीत हंगामासाठी भोगावती साखर कारखान्याला जास्तीत जास्त म्हणजे 2032 टन ऊस नेऊन प्रथम क्रमांक म्हणजे भोगावती केसरी पटकावला असून धनाजी पाटील कौल व कर यांना वीस हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील व्हाचेअरमन राजेंद्र कवडे मॅनेजर डायरेक्टर संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला , त्यानंतर कं थे वाडी गावामध्ये वाजत गाजत धनाजी पाटील कौल व कर यांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येन

अकोला लोकसभा मतदारसंघातून काॅग्रेस पक्षाचा उमेदवार देऊ नये प्रा. विजयराव तुरुकमाने.

Image
  अकोला लोकसभा मतदारसंघातून काॅग्रेस पक्षाचा उमेदवार देऊ नये प्रा. विजयराव तुरुकमाने. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर ------------------------------- महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या मध्ये आजच्या तारखेला युती झाले ली नाही त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले अॅडहोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देऊ नये अशी मागणी प्राचार्य डॉ विजय तुरुकमाने वरिष्ठ उपाध्यक्ष वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी वरिष्ठांना केली आहे मतविभागणी. मुळे तेवढ्याच फरकाने भा ज् पा अकोला लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत विजयी झाले आहे तशी. पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काॅग्रेस पक्षाचा उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघातून न देता वंचित बहुजन आघाडी ला पाठींबा धावा अशी रिसोड मतदारसंघातून फार मोठी मागणी होत आहे अशी विनंती काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना केली आहे

बोंद्रे नगर येथे रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न.

Image
 बोंद्रे नगर येथे रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------------- कोल्हापूर येथील बोंद्रे नगर मधील गणेश पार्कमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली गणेश पार्कमध्ये आज सकाळपासून लहान बच्चे मुले महिलावर्ग स्टेरिओ लावून रंगपंचमी नाचत नाचत खेळत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते अशा पद्धतीने गणेश पार्कमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

खासदार संजय मंडलिक यांची भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट.

Image
  खासदार संजय मंडलिक यांची भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट. खासदार संजय मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदार संघातून शिवसेनेचे तिकीट जाहीर होताच त्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट दिली  या वेळी उपस्थित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक साहेब समरजीत घाडगे साहेब महेश जाधव साहेब बरीच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महेश जाधव यांनी खासदार मंडलिक साहेब यांना असे सांगितले की खासदार साहेब तुम्ही प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा सन्मान करा खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे पुतळा सोन्याचा असून उपयोग नाही आणि काम पितळे सारखं होता कामा नये त्यामुळे इथून पुढे तुम्ही पाच वर्षे तुमचे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजे आम्ही दिवस रात्री करू आणि विजय ची माळ तुमच्या गळ्यात घालू अशी महेश जाधव यांनी खासदार संजय मंडलिक साहेबांना ग्वाही दिली.

गांधीनगर ठाण्यात पोलिसांचे स्वच्छता अभियान.

Image
  गांधीनगर ठाण्यात पोलिसांचे स्वच्छता अभियान. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  गांधीनगर प्रतिनिधी शशिकांत कुंभार --------------------------- गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचरा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी गोळा करून पेटवून दिला व आपले हद्द स्वच्छ करून परिसर एकदम चकाचक केला. या अभियानामध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला

पारा पोहचला चाळीशी पार, नागरिक उकाड्याने हैराण.

Image
  पारा पोहचला चाळीशी पार, नागरिक उकाड्याने हैराण. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर. --------------------------- रिसोड तालुक्यातील कमाल तापमानामध्ये झपाट्याने वाढ झाली असून आज दिनांक 28 मार्च रोजी तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे अजूनही उष्णतामान वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.         मागील आठवडाभरापासून तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत आज दिनांक 28 मार्च. रोजी कमाल तपमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले त्यामुळे दिवसभर शरीराची लाही लाही झाली तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील पंधरवड्यापूर्वी ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरण दमट झाले होते त्यानंतर मागील चार-पाच दिवसापासून मात्र तापमानामध्ये अचानक वाढ झाली आहे मागील दोन दिवसापासून तापमानामध्ये कमालीची वाढ झाली असून पारा चाळीशी पार पोहोचला आहे एप्रिल महिन्यामध्ये उकाड्याला तोंड द्यावे लागणार आहे उन्हामुळे थंड पदार्थाच्या मागणीतही वाढ झाली आहे होळी नंतर उष्णता मा

अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपला टेन्शन; नवनीत राणा विरोधात'प्रहारचा' उमेदवार.

Image
  अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपला टेन्शन; नवनीत राणा विरोधात'प्रहारचा' उमेदवार. ------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज  महाराष्ट्र. अमरावती जिल्हा प्रतिनिधी पी.एन.. देशमुख.  ------------------------------------- अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता'बच्चू कडू'यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार नाही या अमरावती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवीले आहे. प्रहार चे मेळघाट मधील आमदार राजकुमार पाटील म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावती येथील प्रहार संघटनेने उमेदवार उतरावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. अमरावती मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश भाऊ यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहार चे उमेदवार असतील अशी घोषणा मी करतो असे त्यांनी सांगितले. तसेच दिनेश भाऊ हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बुक यांना प्रहार

पांडूरंग पाटील यांचे निधन.

Image
  पांडूरंग पाटील यांचे निधन. म्हाकवे( ता. कागल) येथील शेतकरी पांडूरंग दादू पाटील ( वय ८४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तिन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे लोकमतचे पत्रकार दत्तात्रय पाटील यांचे ते वडील होत.

मेढा हद्दीतील शरिराविरुध्दचे तसेच अवैद्य दारु विक्री करणाऱ्या ०४ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार.

Image
  मेढा हद्दीतील शरिराविरुध्दचे तसेच अवैद्य दारु विक्री करणाऱ्या ०४ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा प्रतिनिधी  --------------------------------- सातारा जिल्हयामध्ये मेढा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) प्रेम ऊर्फ बचलु विलास पाटें, वय २४ वर्षे, २) गणेश विष्णु शिंदे, वय २३ वर्षे, ३) सनि विकास कासुडे, वय २२ वर्षे, ४) राहुल रामा कुन्हाडे, यय २५ वर्षे, सर्व रा. मेढा, ता जावली जि.सातारा, यांचेवर गर्दीमारामारी करून खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत पोचवणे, अवैद्य दारुची चोरटी विक्री करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी संतोष तासगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक, मेढा पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षे तडीपार करणेचाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी बी. वाय. भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकनाथ शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर.

Image
 लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकनाथ शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर. हुपरी प्रतिनिधी जितेंद्र जाधव शिवसेनाप्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभेसाठी अधिकृत आठ उमेदवारांची यादी जाहीर केली.  1) मुंबई दक्षिण मध्य श्री राहुल शेवाळे 2) कोल्हापूर श्री संजय मंडलिक 3) शिर्डी श्री सदाशिव लोखंडे 4) बुलढाणा श्री प्रतापराव जाधव 5) हिंगोली श्री हेमंत पाटील 6) मावळ श्री श्रीरंग बारणे 7) रामटेक श्री राजू पारवे 8) हातकणंगले श्री धैर्यशील माने

नवरा माझा नवसाचा पार्ट - २(मराठी चित्रपट )चे शूटिंग (श्री क्षेत्र गणपतीपुळे ) येथे पूर्ण..

Image
नवरा माझा नवसाचा पार्ट - २(मराठी चित्रपट )चे शूटिंग  (श्री क्षेत्र गणपतीपुळे ) येथे पूर्ण..  विशेष प्रतिनिधी - आशिष पाटील  नवरा माझा नवसाचा पार्ट 2चे शूटिंग पूर्ण झाले नंतर सचिन जी पिळगावकर आणि स्वप्निल जोशी यांना श्रींची प्रसाद म्हणून प्रतिमा देण्यात आली श्री अभिजीत घनवटकर मुख्य पुजारी देवस्थान गणपतीपुळे गणपती मंदिर,दि.२०मार्च ते २२मार्च २०२४ रोजी या चित्रपटाचे चित्रीकरण गणपतीपुळे येथील समुद्रकिनार पट्टीवर सुरु होते, या चित्रपटच्या पार्ट २ चे शुटिंग पूर्ण झाले असून लवकरच हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल  असे अभिनेते, सचिन पिळगावकर यांनी सांगितले.

सैन्य दलात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारा भामटा गजाआड.

Image
  सैन्य दलात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारा भामटा गजाआड. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार ------------------------------------ सैन्य दलात नोकरी लावतो म्हणून 38 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार हळदी येथील रणजीत विष्णू पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. फसवणूक करणारा भामटा बाजीराव शामराव मोहिते( वय वर्षं 46) हा गुन्हा केल्यापासून फरारी होता. त्यास गुरवारी स्कूल कंपाऊंड नागाळा पार्क येथे शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिकंदर यांनी सीताफिने अटक केली. सदर आरोपी सात वर्षे फरारी होता.सदर आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता दिनांक 02/04/2024 पर्यंत मा. न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे. या भामट्याने आणखी किती जणांना फसवले आहे, हे आता लवकरच उघड होईल. तसेच त्यास पडद्यामागून कोणी मदत करत होते का,हा सुद्धा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाला असून याचा तपासही पोलिसांना करावा लागणार आहे. अलीकडे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत.

कराड नगरपालिका हद्दीमध्ये कोल्हापूर नाका ते एस.टी पोपट भाई पेट्रोल पंप ते भंगार चौक या ठिकाणावरील अंडरग्राउंड पाईप बदलणे व बंदिस्त गटारांचे काम सुरू असल्याने कराड शहरातील वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल.

Image
 कराड नगरपालिका हद्दीमध्ये कोल्हापूर नाका ते एस.टी पोपट भाई पेट्रोल पंप ते भंगार चौक या ठिकाणावरील अंडरग्राउंड पाईप बदलणे व बंदिस्त गटारांचे काम सुरू असल्याने कराड शहरातील वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कराड प्रतिनिधी  वैभव शिंदे -----------------------------------      त्याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २७/०३/२०२४ पासून कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत कराड नगरपरिषद कराड यांचे वतीने कराड नगरपालिका हद्दीमध्ये कोल्हापूर नाका ते एस.टी पोपट भाई पेट्रोल पंप ते भंगार चौक या ठिकाणावरील अंडरग्राउंड पाईप बदलण्याचे व बंदिस्त गटाचे काम चालू करणार असले बाबत कळविले आहे. तरी कराड नगरपालिका हद्दीमध्ये अंडरग्राउंड पाईप बदलणे व बंदिस्त गटाचे काम पूर्ण होईपर्यंत कराड शहरातील वाहतुकीचे खालील प्रमाणे नियोजन होणे आवश्यक आहे.     वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल खालील प्रमाणे - १. भेदा चौक, कराड येथून पोपट भाई पंप मार्गे पुणे व कोल्हापूर बाजूकडे जाणारे सर्व वाहने पोपट भाई पेट्रोल पंप - हॉटेल पंकज ची मागची बाजू - कराड हॉस्पिटल - कोयना मोरी मार्गे महामार्

लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी 14 वर्षापासून घरपोडी मधील फरारी असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात.

Image
  लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी 14 वर्षापासून घरपोडी मधील फरारी असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात. ----------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोणंद प्रतिनिधी  ------------------------       लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 98/2010 भादवि. 457, 380 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हे अंतर्ग सदर गुन्हयातील आरोपी नामे चोच्या ऊर्फ शुभम राज्या शिंदे वय 38 रा. शेळकेवस्ती लोणंद ता. खंडाळा जि. सातारा याने गुन्हा केलेपासुन तो अदयपर्यंत फरारी होता. सदर आरोपीचा शोध घेणेकामी सपोनि श्री सुशिल भोसले यांनी वरीष्ठांचे मागदर्शनाखाली पोहवा संतोष नाळे बनं. 1200, पोहवा. नितीन भोसले बनं. 473, पोना बापु मदने बनं. 1151, पोकों. विठठल काळे बनं. 1483, पोकॉ. अभिजित घनवट बनं. 2395, यांचे पथक नेमले होते. आरोपी चोच्या ऊर्फ शुभम राज्या शिंदे हा त्याचे घरी दिनांक 26/3/2024 रोजी येणार असल्याची माहीती मिळाल्याने सपोनि श्री सुशिल भोसले यांचे मागदर्शनाखाली वरील पथकातील अंमलदार यांनी शेळकेवस्ती लोणंद येथे त्याचे राहत्या घराचे आजुबाजुला सापळा रचला. सकाळी 9.00 वाजताचे सुमारास फरारी आरोपी चोच्या ऊर्फ शुभम शिंदे

गांधीनगरच्या उपसरपंचपदीविनोद हजूराणी यांची निवड तर माजी सरपंच रितू लालवानी पराभवामुळे महाडिक गटाला धक्का.

Image
  गांधीनगरच्या उपसरपंचपदीविनोद हजूराणी यांची निवड तर माजी सरपंच रितू लालवानी पराभवामुळे महाडिक गटाला धक्का. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार  ---------------------------------  गांधीनगरच्या उपसरपंचपदी बंटी पाटील गटाचे विनोद हजूराणी यांची निवड झाली. त्यांना अकरा मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार रितू लालवानी यांना केवळ सहा मतावर समाधान मानावे लागले. माजी सरपंच रितू लालवानी यांच्या पराभवामुळे हा निकाल महाडिक गटाला धक्का देणारा ठरला. गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये महाडिक गटाचे सरपंचसह  नऊ सदस्य आहेत, तर विरोधी बंटी पाटील गटाचे नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत. उपसरपंच पदासाठी विनोद हजुराणी आणि रितू लालवानी यांच्यात लढत झाली. त्यात हजुरानी अकरा मतानी विजयी झाले. एक मत बाद झाले. महाडिक गटातील  फुटीचा बंटी पाटील गटाने लाभ उठवला. व रितू लालवानी  यांचा पराभव महाडिक गटाला धक्का देणारा आहे. बंटी पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्य सनी चंदवानी व निवास तामगावे व अन्य सदस्यांनी हजुरानी यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी.

Image
 लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम ------------------------------------ सांगली दि 27 (जी .मा .का) लोकशाही बळकटीकरणांमध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी स्वीप (SVEEP )  कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती वर भर देण्यात येत आहे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी इयत्ता 7 मे रोजी मतदान होत आहे सर्व मतदारांनी लोकशाही बळकटी करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी यावेळी केले . मतदान जनजागृती साठी उपक्रमांतर्गत आज सकाळी सात वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती  धोडमिसे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल महानगरपालिका आयुक्

साखर कामगाराची मुलगी बनली तहसीलदार खुपीरे गावातील तहसीलदारपदी निवड होणारी रेश्मा निकम पहिली मुलगी

Image
  साखर कामगाराची मुलगी बनली तहसीलदार खुपीरे गावातील तहसीलदारपदी निवड होणारी रेश्मा निकम पहिली मुलगी. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  पन्हाळा प्रतिनिधी  आशिष पाटील  ----------------------------- कोपार्डे -लहानपणापासूनच एमपीएससी होऊन प्रशासकीय अधिकारी बनण्याचे ध्येय, त्याला आई सुनिता ववडिल खंडेरावनी दिलेले प्रोत्साहन यामुळे खुपीरे (ता. करवीर) येथील रेश्मा खंडेराव निकम या साखर कामगाराच्या मुलीने तहसीलदार पदाला गवसणी घालून अभिमानस्पद यश मिळवले आहे.खुपीरे गावातील पहिली तहसीलदार बनल्याने गावात रेश्मावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.    दोन मुली व एक मुलगा अशी खंडेराव यांना अपत्य.रेश्मा कुटुंबातील दुसरी मुलगी. शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकाने पास होणारी मुलगी.पद्माराजे हायस्कूल मध्ये माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या रेश्माने १० वीची परिक्षा ९४ टक्के गुण मिळवले. पण एमपीएससीच्या परिक्षेला शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर आवश्यक असल्याने रेश्माने स्पर्धा परिक्षेबरोबर प्लँन बी म्हणून इलेक्ट्रॉनिक अँण्ड टेलीकम्युनिकेशनचा डिप्लोमा कोल्हापूर गव्हर्मेंट कॉलेज मध्ये व २०१४ला तीन वर्ष

अतिरिक्त आयुक्तांनी शंभर फुटी रस्त्याबाबत लक्ष घालून सामाजिक कार्यकर्त्यांसह रस्त्याची पाहणी करावी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी.

Image
 अतिरिक्त आयुक्तांनी शंभर फुटी रस्त्याबाबत लक्ष घालून सामाजिक कार्यकर्त्यांसह रस्त्याची पाहणी करावी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम ------------------------------- सांगली मध्ये सुरू असलेल्या शंभर फुटी म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गाचे पंधरा कोटी पेक्षा जास्त रुपये खर्चून सुरू असलेले काम हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याच्या विरोधात लोकहित मंचाच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून आवाज उठवला जात असतानाही महापालिका प्रशासनाकडून याकडे डोळे झाक केले जात असल्याने आज ही लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी स्वतः शंभर फुटी रस्त्याचे पाहणी केली यामध्ये त्यांना रस्त्याची लेवल नसल्याचे तसेच वापरले जाणारे मटरेल दर्जेदार नसल्याचे त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारण पाच पाच फूट रस्ता खोदून ठेवलेला आहे त्यावर फुटपाथ बनवण्याची योजना असेल तर ते काम का केलं नाही असा स्वारी मनोज भिसे यांनी केला आहे शिवाय हा रस्ता अनेक ठिकाणी आरला गेल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे लोकहित मंचाचे अध्

निवडणूक आचारसंहितेमध्ये लोहा पोलिसांची धडक मोहीम. दारू जुगाराचे आठ ठिकाणी छापे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.14 आरोपी अटक, 11 गुन्हे दाखल.

Image
निवडणूक आचारसंहितेमध्ये लोहा पोलिसांची धडक मोहीम. दारू जुगाराचे आठ ठिकाणी छापे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.14 आरोपी अटक, 11 गुन्हे दाखल. ------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधि  अंबादास पवार  ------------------------- दि.24 व 25 /3/2024 रोजी लोहा पोलिसांनी निवडणूक आचारसंहिता निमित्ताने आणि होळी धुलीवंदन सणाच्या निमित्ताने लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारी मध्ये लोहा पोलिसांनी अवैध दारू बाळगणाऱ्या सात आरोपींना पकडून त्यांच्याकडून दारूचा एकूण 1 लाख 52 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 10 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे पोलीस स्टेशनला सात गुन्हे दाखल केले.  दारू विक्रीतील 10 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया करून नंतर सोडले.  एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना पकडले त्यामध्ये 1 लाख 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी विरोधात जुगार खेळत व खेळवत असल्याबाबत जुगार अधिनियम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केला. लोहा पोलिसांनी शहरात पण विविध ठिकाणी नाकाबंदी सुर

कृषी प्रधान सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना.

Image
  कृषी प्रधान सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधी  अंबादास पवार  --------------------------  महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेती करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी लोहा तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी गट समूहाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग आत्मा अंतर्गत तालुक्यातील २५ सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या शेतकरी गटाला प्रधान्य देण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात आली असुन सदरील कंपनीच्या संचालक मंडळाची निवड लोहा तालुका कृषी अधिकारी पोटपेलवार आत्माचे बिटीएम सोहेल सय्यद यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी कृषीप्रधान शेतकरी सेंद्रिय शेती उत्पादक कंपनीच्या अध्यक्षपदी रत्नाकर पाटील ढगे तर उपाध्यक्षपदी देविदास मोरे यांची निवड करण्यात आली यावेळी गटातील शेतकरी व कंपनी चे संचालक रत्नाकर पाटील ढगे, देविदास मोरे ,सरपंच हिरामन मोरे,रामेश्वर पवार, आनंद जाधव, ज्ञानोबा येवले, सुनील मोरे, चैताली मोरे, आमृतराव मोरे, पत्रकार गणपत जामगे यांची उपस्थिती होती यावेळी बॅक व्यवहाराकरिता सरपंच हिरामन मोरे व आनंद जाधव यांची निवड क

साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे भोसले यांनाच तिकीट अधिकृत घोषणा विद्यमान खासदारांचा दावा.

Image
  साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे भोसले यांनाच तिकीट अधिकृत घोषणा विद्यमान खासदारांचा दावा. ----------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी   अमर इंदलकर  ----------------------------------------  राजेंची दिल्ली मोहीम फत्ते; साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंनाच तिकीट, लवकरच अधिकृत घोषणा, विद्यमान खासदाराचा दावा सातारा लोकसभा : राजेंची दिल्ली मोहीम फत्ते; साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंनाच तिकीट, लवकरच अधिकृत घोषणा, विद्यमान खासदाराचा दावा  उदयनराजेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून उद्याच घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहितीही रणजीत नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. सातारा लोकसभा : राजेंची दिल्ली मोहीम फत्ते; साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंनाच तिकीट, लवकरच अधिकृत घोषणा.   सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याच्या ( *सातारा लोक सभा निवडणूक 2024* ) जागेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू आहेत. अशातच आता साताऱ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून (BJP) उमेदवारी निश्चित क

नागाव फाटा येथे वाहतुकीची कोंडी वाढली ठोस उपाय करणेची मागणी.

Image
  नागाव फाटा येथे वाहतुकीची कोंडी वाढली ठोस उपाय करणेची मागणी. -------------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  शिरोली प्रतिनिधी  अमित खांडेकर  -------------------------------------------- सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ब्रिज चे काम प्राधान्याने सुरू आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेथे ब्रिज चे काम सुरू आहे,त्याठिकाणची वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहे. त्याचबरोबर मुख्य हायवे व सेवा रस्ता रुंदीकरणाचे कामही सुरू आहे.खासकरून सांगली फाटा ते शिये फाटा या परिसरात सेवा रस्त्याची रुंदी खडीकरण करून सपाटीकरण करून वाढविण्यात आली आहे. या सेवा रस्यावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू आहे. या भागातील शोरूम,ट्रान्सपोर्ट, मार्बल ,फर्निचर दुकाने या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठी आहे.विशेषतः सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत हा रस्ता शिरोली एम आय डी सी तील कंपन्याची जनरल शिफ्ट सुटल्यांतर नागाव फाटा येथील चौकात चारही बाजूनी वाहने येत असल्याने वाहतुकीची रोजच कोंडी होत आहे.तसेच रस्ता आखूड झाल्याने ट्रॅफिक जाम वारंवार होत आहे.सायंकाळी एम आय

गरीब कुटुंबाच्या घराला भीषण आग; प्रशांत गोळे यांचा मदतीचा हात.

Image
  गरीब कुटुंबाच्या घराला भीषण आग; प्रशांत गोळे यांचा मदतीचा हात. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर ------------------------------ . तालुक्यातील नेतंन्सा येथील गरीब कुटुंबाच्या तिन घरांना अचानक लागलेल्या आगीत घरांची राखरांगोळी तर झालीच, अन्नधान्य व सर्व साहित्याचाही कोळसा झाला, व घर बांधणीसाठी घरात असलेला ९० हजार रु रक्कम जळून खाक झाली उघड्यावर आलेल्या या कुटुंबांच्या मदतीला ऐनवेळी प्रा. प्रशांत गोळे पाटील धावून आले व त्यांनी आगग्रस्तांचे सांत्वन करून प्रत्येकी दहा हजार रु तिन्ही कुटुंबांना ३० हजार रू तत्काळ आर्थिक मदत दिली. नेतंन्सा येथील लक्ष्मी नारायण महाविद्यालय नजीक बागवान कुटुंब वास्तव्यास आहे. मंगळवार दिनांक २६ मार्च रोजी सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यावेळी आग लागल्याचे लक्षात येताच सर्वांनी घराबाहेर पळ काढला. व वेळेवर सावधान की दाखवत घरातील असलेले गॅस सिलेंडर तात्काळ बाहेर काढले त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. गावकऱ्यांनी पाणी टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले;परंतु आग एवढी भीषण

ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी पुनम देसाई यांची निवड.

Image
  ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी पुनम देसाई यांची निवड. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------   कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी राधानगरी येथील उद्योजिका पूनम देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे .  जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांच्या आदेशाने नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठीत करण्यात आली असून यामध्ये ग्राहक संघटना,वैद्यकीय,व्यापार,शेतकरी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे समितीचे सचिव असणार आहेत .  या परिषदेमध्ये ग्राहक संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून पूनम देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे ..त्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या कोल्हापूर जिल्हा महिला संघटिका म्हणून कार्यरत आहेत . महिला सक्षमीकरण, तनिष्का,दक्षता समिती,मानींनी अश्या अनेक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे ...

मानसिंगराव अण्णा " विकासाचे महान विद्यापीठ.

Image
  मानसिंगराव अण्णा " विकासाचे महान विद्यापीठ. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मेढा  प्रतिनिधी प्रमोद पंडीत  ------------------------------------- ओझरे गावचे सुपुत्र ' जावली पंचायत समितीचे मा सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य ' मुंबई माया नगरीतील नळ बाजारातील व्यापारी मा . मानसिंगराव गेणू मर्ढेकर एक महान समाज सुधारक हारपले . 1972 साली संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढली होती त्यातच कण्हेर धरणाचा शुभारंभ झाला. आकाशवाणी वरुण दुष्काळाच्या छायेत महाराष्ट्र राज्यातील सर्व गावांना झळा सोसाव्या लागत होत्या अनेक ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाने अनेक रस्ते व विकासात्मक कामे होवून लोक उपाशी राहू नयेत म्हणून अनेक उपाययोजना करून या दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. लोक होरपळून गेली असता नव्यानेच कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मेढा उत्तर दक्षिण विभागातील कण्हेर जलाशयातील बुडीत क्षेत्रातील अनेक गावचा प्रश्न लोकांच्या समोर आ वासून उभा होता. त्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आदरणीय मानसिंग

रंग लावून पळताना परप्रांतीय तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडलेने मृत्यू.

Image
रंग लावून पळताना परप्रांतीय तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडलेने मृत्यू.   ------------------------------------ फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  शिरोली प्रतिनिधी अमित खांडेकर  ------------------------------------ रंग लावून पळताना पाय घसरुन विहिरीत पडलेने परप्रांतीय मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला , धर्मेंद्र जरेस्वर तुरा ( उत्तरप्रदेश ) असे त्याचे नाव आहे , धर्मेंद्र तुरा हा इचलकरंजी येथील एका कंपनीत कामाला होता होळी सनांनिमित्त तो मौजे वडगांव येथे आपल्या मित्रांच्या कडे होळीचे रंग खेळण्यासाठी आला होता मित्रासोबत मौजे वडगाव येथील एका विहिरी शेजारी होळी साजरी करत असताना एकमेकाना रंग लावून पळत असताना विहीर च्या काठावरून धर्मेंद्र चा पाय घसरून तो विहिरीत पडलेने त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला , घटनेने त्याचे मित्र घाबरून गेले होते घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे झाली आहे

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे धाबे दणाणले.

Image
  कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे धाबे दणाणले. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार. ----------------------------------  कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या अखत्यारीत 42 गावांचा समावेश करण्यात आला होता या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या अखत्यारीत वळीवडे चिंचवाड उंचगाव गडमुडशींगी गांधीनगर या ग्रामपंचायत पण येतात वरील ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकामे सुरु असून त्यां बांधकामावर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर आर्थिक लाभापोटी नुसते पंचनामा करण्या व्यतिरिक्त काहीच केलेले नाही अनेक सामाजिक संघटनांनी कार्यकर्त्यानी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या कडे बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाने पंचनामा करून फाईल कपाटात ठेवून दिल्या.अन ज्या बांधकामावर कारवाई करुन स्थळी पाहणी पंचनामे केले त्या बेकायदेशीर बांधकामे पूर्ण होऊन मोठ्या दिमाखात ब

प्रफुल्लीत केंद्रामार्फत भाविकांना फळे वाटप.

Image
  प्रफुल्लीत केंद्रामार्फत भाविकांना फळे वाटप. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र कोल्हापूर प्रतिनिधी  --------------------------------- कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील विविध समाज उपयोगी उपक्रम राबविणार्‍या प्रफुल्लीत केंद्रामार्फत जोतिबाच्या पाचव्या खेट्याला जोतिबा वेळ भाविकांना फळे वाटप करण्यात आली.  रविवारी जोतिबाचा शेवटचा खेटा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी उन्हाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रफुल्लीत केंद्राच्या टीमने पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी भाविकांना फळे वाटप करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला भाविकांनी या उपक्रमाबद्दल धन्यवाद मानून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रफुल्लीत केंद्राचे संस्थापक प्रफुल्ल पाटील, मेन राजाराम हायस्कूलच्या व्यवसाय शिक्षिका दिपाली पाटील, प्रिन्स पाटील, राजवर्धन आबदार, श्रावणी लाड, अरुणा लाड, रेश्मा कातकर, साक्षी कांबळे, सिद्धेश चिले, बिस्मिल्ला नदाफ हे उपस्थित होते प्रफुल्लीत केंद्राच्या संचालिका बागवान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

निधन वार्ता.

Image
  निधन वार्ता. नानीबाई चिखली ता कागल जि कोल्हापूर येथील सदनशिल शेतकरी तानाजी गुंडू कुंभार व.व.64 यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी नातवंडे पाच भाऊ असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन बुधवारी सकाळी नानीबाई चिखली येथील स्मशानभूमीत सकाळी 9 वा होणार आहे

वाई बावधन बगाड यात्रा २०२४.

Image
  वाई बावधन बगाड यात्रा २०२४. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ------------------------------------  वाई बावधन बगाड्याचे मानकरी श्री विकास तानाजी नवले, राहणार शेलारवाडी, बावधन यांना बगाडाचा मान मिळाला आहे. बहिणीला अपत्य प्राप्ती साठी त्यांचे मोठे बंधू वैभव नवले यांनी नाथांना नवस केला होता... तो पूर्णत्वास गेला भावाने केलेल्या नवसाची पूर्ती करण्यासाठी श्री विकास तानाजी नवले हे कौलासाठी बसले होते आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बावधन बगाड यात्रेसाठी मानाचा बगाड्या होण्याची संधी मिळाली आहे .. शनिवार ३० मार्च २०२४ रोजी बगाड यात्रा संपन्न होत आहे...

निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने लोहा पोलिसांची शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी.

Image
  निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने लोहा पोलिसांची शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधि अंबादास पवार  -------------------------------------- 60 वाहने जप्त अनेक वाहनांची चेकिंग विदाऊट लायसन विदाऊट आरसी बुक विदाऊट नंबर फॅन्सी नंबर अशा वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.  गाडीवर नंबर न टाकणारे संशयास्पद वाहने अशी लोहा पोलिसांनी एकूण 60 वाहने जप्त केली. गाडी मालक त्याचे आधार कार्ड गाडीची कागदपत्र पाहूनच खात्री करूनच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करूनच सदरच्या गाड्या सोडण्यात येत आहेत.  दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी ब्रेक आनालायझर मशीन चा वापर करण्यात येत आहे.  सदर नाकाबंदी दरम्यान 14 लोकांची ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी करण्यात आली.  वाहनामध्ये दारू पैसा साहित्य वाहतूक होत आहे का याबाबत विशेष करून चेकिंग सुरू आहे.  आचारसंहितेचा भंग करणाऱ्या कुठल्याही कृतीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येणार आहे.

जयसिंगपूर व चिपरी नांदणी नाका शिरोळ हद्दीत "अमर "मटका व्यवसायिकाची पकड !

Image
जयसिंगपूर व चिपरी नांदणी नाका शिरोळ हद्दीत "अमर या"मटका व्यवसायिकाची पकड ! -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  जयसिंगपूर प्रतिनिधी  नामदेव भोसले -------------------------------- कुटुंबे, तरुण पिढी बरबाद करणाऱ्या व्यवसायावर कारवाई होणार का ? जयसिंगपूर शहर हे , चिपरी नांदणी नाका हे ग्रामीण खेड्याशी जवळून संबंध येतो. येथे नेहमी रेलचेल असते. त्यामुळे या ठिकाणच्या सर्व प्रकारच्या उद्योगाबरोबर मटका हा व्यवसाय देखील हाऊसफुल्ल या सदराखाली चालत असल्याचे सर्वज्ञात आहे.   नांदणी नाक्यापासून काही अंतरावर राहत असणाऱ्या एका झोपडीत राहणाऱ्या एक मटका अवैध्य व्यवसायकाने जयसिंगपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय काढून मटका व्यवसायात चित्याची झेप घेतली आहे. मात्र, या व्यवसायाची जबाबदारी आणि" अमर" गाजवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडे सोपवली असल्याचे दिसत आहे. शहरात मटका, विनापरवाना , गावठी मद्य, विनापरवाना देशी व विदेशी दारू विक्रीने सीमा पार केली आहे. जयसिंगपूर मध्ये एका परवानाधारक व्यवसायिकाने आपला बार एका लायन्स वर दोन बार चालू करून शासनाला चुनाच लावला आहे न

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सेमाडोह जवळ एसटी बस दरीत कोसळली, २ मृत्यू व 25 जखमी.

Image
  अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सेमाडोह जवळ एसटी बस दरीत कोसळली, २ मृत्यू व 25 जखमी. --------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र अमरावती जिल्हा प्रतिनिधी. पी एन देशमुख ----------------------------------------- अमरावती येथून निघालेल्या परतवाडा आग्रहाची एसटी बस एम एच ०७सी९४७८ क्रमांकाची परतवाडा घटना हा अपघात घडला. रविवार आज सकाळी ११.३० वाजता जवाहर कुंड येथे घाट वळणावर अचानक चालकाकडून एसटी बसअनियंत्रित झाल्याने३० फुट खोल दरी कोसळली. त्या दोन महिला ठार झाल्या तर २५ 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजीकच्या सीमा डॉ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ईंदू समाधान गंत्रे वय ६५(रा. साठ मोरी ता. खकणार मध्य प्रदेश व ललिता चिमोटे वय 30 बुरडघाट अशी मृतांची नावे असून त्यांचे मृतदेह एस टी मध्येच आहेत. आरोग्य यंत्रणेच्या वतीने तात्काळ जखमींना रुग्णवाहिका द्वारे सीमा डॉ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ता तथा उपसरपंच राजेश सेमलकर ,ओम प्रकाश तिवारी ,सुनील येवले ,शिवा काकड ,प्रदीप सेमलकर

बिबट्या आणि त्याच्या दोन पिलांचा मुक्त संचार गावकरी धास्तावले.

Image
  बिबट्या आणि त्याच्या दोन पिलांचा मुक्त संचार गावकरी धास्तावले. ------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   मेढा प्रतिनिधी  शेखर जाधव ------------------------ मेढा :- मालचौंडी ता.जावली आणि परिसरामध्ये बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा रात्रीच्या सुमारास गावातून मुक्त संचार होत असून गावातील आतापर्यंत तीन पाळीव कुत्र्यांवरती हल्ला केलेला आहे.त्यात तिन्ही पाळीव कुत्रे मृत्युमुखी पडलेले आहेत तसेच बऱ्याच जनावरांच्या गोठ्यावरती सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. बिबट्याच्या आणि पिल्लांच्या या मुक्त संचाराने गावकरी पूर्ण धास्तावले असून त्याच्या या दहशतीमुळे गावामध्ये व आजुबाजुच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्मान झाले आहे. बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा वन विभागाने काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून व पंचक्रोशितुन होत आहे.वारंवार तक्रार देऊ नये याच्याकडे कानाडोळा केलाजात आहे जात आहे .काहीतरी उचीत प्रकार घडण्याच्या अगोदर वनविभागाणे लक्ष घालनेगरजेचे आहे.अशिप्रतिक्रिया जावली विभागातुन येत आहे

अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा कार्यालय पाचवड येथे अण्णासाहेब पाटील यांचा स्मृतीदिन साजरा.

Image
  अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा कार्यालय पाचवड येथे अण्णासाहेब पाटील यांचा स्मृतीदिन साजरा. ------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  भणंग प्रतिनिधी  शेखर जाधव ------------------------- महाराष्ट्र सरकारने जर " मराठा समाजाला सूर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर नाही केले " तर दुसर्‍या दिवशीचा सुर्य हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही... ही भिष्मप्रतिज्ञा लाखो लोकांच्या समोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ रोजी घेतली.शपथ घेत असताना कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या एका डोळ्यात अश्रु तर दुसर्‍या डोळ्यात अंगार होता... की लाखो मराठा समाज एकञ येऊन सुद्धा निर्लज्ज सरकार आपली एकही मागणी मान्य करत नाही...    २३ मार्च १९८२ रोजी सकाळी या मराठयांच्या क्रांतीसुर्याने आपला शब्द खरा करून दाखवला... त्यांनी आपल्या राहत्या घरी आमदार असताना फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या मेंदूत रिव्हॉल्वर ने गोळी झाडून घेतली. अशा मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे मराठ्यांचे पहिले क्रांतीसुर्य ,सातारा जिल्ह्याच

सी.पी.आर. हॉस्पिटल येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा.

Image
सी.पी.आर. हॉस्पिटल येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ----------------------------      कोल्हापूर जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 24 मार्च हा दिवससाची प्रेरणा घेऊन सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन वैद्यकीय उपअधीक्षक सी.पी.आर, हॉस्पिटल डॉ. गिरीश कांबळे यांनी केले आहे. सी.पी. आर, हॉस्पिटल क्षयरोग डिपार्टमेंट येथे आयोजित जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.      सुरुवातीला डॉ.अनिता सैबन्नावर यांनी उपस्थितांना क्षयरोग जनजागृतीपर शपथ दिली. या वेळी डॉ.रॉबर्ट कॉक यांचे फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्षयरुग्णांना सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते क्षयरुग्णांना फळे वाटप करण्यात आले.        जिल्हा क्षयरोग आधिकारी डॉ.माधव ठाकूर प्रास्ताविक भाषणात म्हणाले कि, महान शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये बर्लिन विदयापीठात क्षयरोग टिबीसाठी कारणीभूत मायकोबॅक्

आदरणीय भगवानदादा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व भव्य बॉडी बिल्डर स्पर्धेचे आयोजन.

Image
  आदरणीय भगवानदादा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व भव्य बॉडी बिल्डर स्पर्धेचे आयोजन. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर. ---------------------------- आदरणीय श्री भगवानदादा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व भव्य बॉडी बिल्डर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री भगवानदादा क्षीरसागर हे होते तर् प्रमुख डॉ. धोपे, डॉ. तिवारी, पत्रकार मोहनराव देशमुख हे होते त्यावेळी बऱ्याच रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये किरण दादा क्षीरसागर ,अशोक सोनुने, श्रवण मोरे, सदा चोपडे, शिवा मोहळकर, अमित जाधव, निलेश सारडा, राजू खयरे निलेश महाजन, डॉ मस्के ,अमोल लोथ , सतीश महाराज चोपडे , शुभम क्षीरसागर ,आकाश लांडगे , सागर काळे, अक्षय निर्माण गोविंद पडोळसे आकाश लिंगे शिवा मोहळकर सारंग निर्माण अतिश कुदळे योगेश खाकोली विजय तायडे आदींची उपस्थिती होते. भव्य बाडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भगवानदादा क्षीरसागर व प्रमुख पाहुणे म्हणून सारंग अण्णा जिरवाण