मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गायत्री पाटील व वृषाली महाजन यांचा सत्कार.

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गायत्री पाटील व वृषाली महाजन यांचा सत्कार.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

 रणजीत ठाकूर

---------------------------------

स्थानिक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात 27 फेब्रुवारी मंगळवारला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रसंगी गायत्री सुभाष रंजवे पाटील व वृषाली सिद्धेश्वर महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डॉ विनोद कुलकर्णी प्राचार्य उत्तमचंद बगाडिया माहाविद्यालय रिसोड,जेष्ठ साहित्यिक व नाटककार रामचंद्र भावसार, कृषी तज्ञ संजय उकळकर, सत्कारमूर्ती वृषाली महाजन व गायत्री पाटील इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयचे संस्थापक प्रा. कमलाकर टेमधरे यांनी केले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते वृषाली महाजन व गायत्री पाटील यांचा त्यांच्या परिवारातील सदस्यांसह सत्कार करण्यात आला.सर्वेश प्रवीण हाडे यांनी कुसुमाग्रज्यांची कविता सादर करूर श्रद्धांजली वाहली.वृषाली महाजन हिने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत सब रजिस्ट्रार या पदावर नियुक्ती झाली. तर गायत्री रंजवे पाटील हिने न्यायाधीश होण्यासाठी अवश्य अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतातून 21वी रँक प्राप्त करीत परिवाराचा व मराठी माणसाचा गौरव वाढविला. या सत्काराप्रसंगी वृषाली व गायत्री यांनी आपल्या शैक्षणिक व सामाजिक जीवन प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त करीत सत्काराबद्दल आयोजकांचे आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कमलाकर टेमधरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवि अंभोरे यांनी तर आभार प्रा. प्रवीण हाडे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक रामचंद्र जाधव,प्रा.बी एन चव्हाण,मधुसूदन झूनझूनवाला, विश्वभर डाखोरे,श्रमिक पत्रकार संघांचे पत्रकार फय्याज कुरेशी,राहुल जुमडे,रणजित ठाकूर, अजय कानडे, तौसिफ़ शेख, प्रा. गिते, रामभाऊ नरवाडे, पी.डी पाटील, सिद्धूभाऊ महाजन, सुभाष रंजवे,कॅप्टन देवानंद वाघ, माजी सैनिक जगन्नाथ ठोंबरे,लक्ष्मीबाई लकडे, कुसुमबाई दहाळके, अनिताताई सुभाष रंजवे इत्यादीसह मान्यवर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.