सातारा -चार चाकी वाहन व मोटारसायकल चोरी करणारे अट्टल चोरट्यास अटक.

 सातारा -चार चाकी वाहन व मोटारसायकल चोरी करणारे अट्टल चोरट्यास अटक.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर 

------------------------------

वाहन चोरीचे एकूण १७ गुन्हे उगडकिस आलेले असून ११,८०,०००/-रुपये किमतीची १३ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत .

             (सातारा शहर डी. बी.पथकाची कारवाई)* -----------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी- अमर इंदलकर -----------------------------------

मा.श्री.समीर शेख ,पोलीस अधिक्षक सौ, मा.श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सौ, यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड कीस आणणेबाबत सूचना व मार्गदर्शन केल्याने सातारा शहर पोलिस ठाणेचे मा. श्री.महेंद्र जगताप वरिष्ठ पोलीस निरक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरन विभागात त्याप्रमाणे सूचना व मार्गदर्शन केले. वाहन चोरीचे गुन्ह्याबाबत डी. बी.पथक हे संशयिताची व रेकॉर्डवरील आरोपीची माहिती प्राप्त करीत होते. सदरची वाहने ही रात्रीच्या वेळेत चोरीस जात असल्याने डी.बी.पथकाने रात्रीच्या वेळेस सतर्क पेट्रोलिंग करून तसेच वाहने चोरी झालेल्या ठिकाणी तांत्रिक माहिती प्राप्त केली होती.परंतु सदरचा चोरटा हा सराईत असून तो परजिल्ह्यातील असल्याने तसेच कर्नाटक राज्यामध्ये विविध ठिकाणी वास्तव्यात असल्याने त्याचा निश्चित ठावठिकाना मिळून येत नव्हता .तसेच तो स्वतःची ओळख पटू नये याकरिता दक्षता घेत होता . सदर चोरट्यांची डी.बी.पथक माहिती घेत होते.त्यावेळी त्यास पोलिसांची शोध घेत असलेबाबत संशय आल्याने तो मोटारसायकलवरून स्वतःची ओळख दिसणार नाही अशा रीतीने पळून जाण्याच्या तयारीत असताना डी. बी.पथकाने त्यास शितापिने ताब्यात घेतले .सदरचा चोरटा अत्यंत सराईत असून त्याचेवर यापूर्वी सांगली, कोल्हापूर,कर्नाटक,राज्यात वाहन चोरी. जबरी चोरीचे २९गुन्हे दाखल आहेत. तो सराईत चोरटा असल्याने त्याचेकडे चौकशी करीत असताना तो उडवाउडविची उत्तरे देवून तपासामध्ये सहकार्य करीत नव्हता .परंतु त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली. त्यावेळी त्याने सातारा शहर परिसरातून व रहिमतपूर येथून खालीलप्रमाणे वाहने चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपीचे नाव नागेश हणमंत शिंदे राहणार कोरोची इचलकरंजी ता.जि.कोल्हापूर असून त्याने पुढील प्रमाणे एकूण गाड्या चोरल्या होत्या.

_________________________

 अ. क्र. पोलीस ठाणे गु.र. नं. वाहनाचा प्रकार

१-सातरा शहर५१७/२०२३. के. टी. एम मोटारसायकल

_________________________

२-सातरा शहर १०७१/२०२३. यामाहा आर एक्स १००

________________________

३-सातारा शहर १०६९/२०२३. यामाहा आर एक्स १००

_________________________

४-सातारा शहर ४५/२०२४. यामाहा आर एक्स १००

________________________

५-सातारा शहर ७८/२०२४. करिझमा मोटारसायकल

________________________

६-सातारा शहर ५०/२०२४. टिव्हीस स्टार सिटी 

________________________

७-सातारा शहर ५७/२०२४. एच.एफ डिलक्स मोटारसायकल

_________________________

८-सातारा शहर ११२३/२०२३. मारुती ८००

_________________________

९- सातारा शहर ५०८/२०२३ मारुती ८००

_________________________

१०- सातारा शहर २९७/२०२३.  

मारुती ८००

_________________________

११- सातारा शहर ७०२/२०२३. मारुती ८००      

_________________________

१२- सातारा शहर ३९/२०२३. मारुती ८००

_________________________

१३- सातारा शहर ११४०/२०२४. मारुती झेन       

_________________________

१४-सातारा शहर ५९/२०२४ सेंट्रो कर  

_________________________

१५- सातारा शहर ११५३/२०२३. अशोक लेलंड दोस्त मॉडेल

_________________________

१६- सातारा शहर ८४७/२०२३. अशोक लेलंड दोस्त मॉडेल

_________________________ 

१७- रहिमतपूर २८/२०२४. पॅशन प्रो मोटारसायकल 

_________________________सदरची कारवाई श्री माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख. मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो,मा. पोलीस उप अधीक्षक (गृह ) अतुल सबनीस, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकाटिकारण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने.पोलीस उप निरीक्षक सुधीर मोरे,पो हवालदार सुजीत भोसले,निलेश जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते विक्रम माने, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घाडगे, इरफान मुलाणी, मच्छिन्द्रनाथ माने, सचिन रिटे, संतोष कचरे, सुशांत कदम, सागर गायकवाड, विशाल धुमाळ यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.