स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व फलटण ग्रामिण पोलीस ठाणे यांची कारवाई.

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व फलटण ग्रामिण पोलीस ठाणे यांची कारवाई.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर 

-----------------------------
    फलटण ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरद गावचे हद्दीत गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून ६,४१,५००/- रुपये किंमतीचा २५.६६० किलो ग्रॅम गांजा च ६३,०००/- रुपये किमतीची मोटार सायकल व २ मोबाईल हॅन्डसेट जप्त....
-----------------------------------------------

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणारे इसमांचे विरुध्द कारवाया करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.
      पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
         दि.०७/०२/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पिंपरद ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीतील गगणगिरी मंगल कार्यालयाचे समोर तीन इसम मोटार सायकल क्रमांक एम.एच.११ बी.डब्ल्यू ५२९८ वरुन अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांना पथकासह नमुद ठिकाणी जावून प्राप्त माहितीमधील इसमांना ताब्यात घेवून त्याचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी फलटण ग्रामिण पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सापळा लावून तीन इसमांना ताब्यात घेतले. नमुद इसमांच्या कब्जातून एकूण ६,४१,५००/- रुपये किमतीचा २५.६६० किलो ग्रॅम गांजा च ६३,०००/- रुपये किमतीची मोटार सायकल व मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करुन त्यांचेचिरुध्द फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गु.र.नं. १५०/२०२४ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०(ब) (ii) (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
       श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रविंद्र फार्णे, विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, सनी आवटे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अजित कर्णे, मनोज जाधव, अमित झेंडे, हसन तडवी, केतन शिंदे, धीरज महाडीक, अनिल खटावकर, अमोल निकम, दत्ता चव्हाण, अमृत कर्पे तसेच फलटण ग्रामिण पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार शांतीलाल ऑबासे, श्रीकांत खरात, सुरज काकडे, नितीन चतुरे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.