मुरगूड येथे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन.

 मुरगूड येथे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन.



 ----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार 

 ----------------------------

मुरगुड ता. कागल येथे आम्ही भारतीय नागरीक या लोकशाहीवादी जनसंघटनेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या (मतदान यंत्र)विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. 

नगरपालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीस्थळ येथे सजग नागरिकांच्या गटाने "ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव" "मतदान मतपत्रिका आमचा अधिकार" संविधान बचाव इव्हीएम हटाव अशा घोषणा दिल्या.


"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना तज्ञांच्या अपेक्षेनुसार भारतीय लोकशाही बळकट होण्यासाठी निष्पक्ष मतदान यंत्रणा आवश्यक आहे पण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये टाकलेल्या मताबाबत सामान्य मतदाराच्या मनात संशय आहे आणि संपूर्ण भारतभर लोकमानसात ही संशयाची मळभ साचली आहे. अशा संदिग्ध वातावरणात मतदार आणि राज्य करणारी यंत्रणा यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे दूर करण्यासाठी निष्पक्ष व निःसंशय पद्धतीने निवडणूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान कागदी मतपत्रिकेवर करणे हा भारतीय जनतेचा अधिकार मान्य करावा अशा आशयाची मनोगते यावेळी व्यक्त करण्यात आली. ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कागदी मतपत्रिका मिळालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. 


यावेळी दलित पत्र डी डी चौगुले अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यात आला सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करून मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली मराठा नेते मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला.


अशोक पाटील डी डी चौगले, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,गजाननराव गंगापुरे,पांडुरंग रणवरे,

एम.टी.सामंत, जोतीराम सूर्यवंशी,पी व्हीं पाटील,जयवंत हावळ,

विजय सापळे, बबन बारदेस्कर,विनायक रानमाळे, बी.एस. खामकर,एस.व्ही.चौगले,पांडुरंग चांदेकर,सिकंदर जमादार,रमेश भोपळे,दत्ता मंडलिक,हेमंत पोतदार

आपचे जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे, मागासवर्गीय सेल जिल्हा अध्यक्ष अर्जुन कांबळे,जिल्हा महासचिव ओंकार पताडे, किरण साळुंखे,अशोक चौगले,रामचंद्र मेटकर,अशोक डवरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.