सावर्डे खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात.

सावर्डे खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कागल प्रतिनिधी

कृष्णात मालवेकर

--------------------------------------

सावर्डे खुर्द तालुका कागल संयुक्त गावभाग मंडळाची छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती  सावर्डे. मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.दिलीप मालवेकर,उप.अध्यक्ष अजिंक्य कदम व खजिनदार मा. बंबू मालवेकर यांच्या हस्ते रथातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सदरील मिरवणुकीत  आकर्षक आतिषबाजी व शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. सदरील जयंती सोहळ्यात गावातील सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी झाले होते.


              शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गावात भगव्या कमानी उभारण्यात येवून ध्वनिक्षेपकावरून शिवरायांचे स्पुर्ती गीते वाजविण्यात येत होती. सावर्डे खुर्द  हे भगवेमय झाले होते. 


             मिरवणुकीत युवा उद्योजक मा.श्री. नवनाथ लिंगडे , शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख मा.दादाराव मालवेकर ,अभी मालवेकर, सुशांत मालवेकर, संयुक्त गावभागचे सर्व कार्यकर्ते तसेच गावातील शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.