सांगवडे फाटा येथे अपघात : एक जण गंभीर जखमी.

सांगवडे फाटा येथे अपघात : एक जण गंभीर जखमी.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

------------------------------------

गांधीनगर:- कोल्हापूर हुपरी रस्त्यावर सांगवडे फाटा येथे चार चाकी आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन अमित बबन पाटील (वय 27), अनिल सुभाष पाटील (वय 32 . दोघे रा. अंकलकोप ता पलुस जिल्हा सांगली) हे दोघे दुचाकी स्वार जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दिनांक 9 रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडला. यावरून चार चाकीस्वार प्रसाद पाटील रा. हुपरी ता. करवीर याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी अनिल पाटील आणि अमित पाटील हे दोघे भाऊ सांगवडे येथील नरसिंह देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन आटोपून सांगवडे फाटा येथे आले असता हुपरीहून येणाऱ्या व्हॅगनार एम एच 09 डीएम 0464 या चार चाकी ने डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच 10 बी वाय 3196 या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये अमित पाटील हा गंभीर जखमी झाला. तर त्याचा भाऊ अनिल पाटील हा किरकोळ जखमी झाला. दुचाकी चे मोठे नुकसान झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . याबाबतची फिर्याद अनिल सुभाष पाटील यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप दळवी करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.