लोहा न.पा.च्या प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविल्याबद्दल लांडेवाडी येथे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा धर्मगुरू म.न.प.श्री संगनबसवेश्वर महाराज स्वामी यांच्या हस्ते भव्य सत्कार.

 लोहा न.पा.च्या प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविल्याबद्दल लांडेवाडी येथे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा धर्मगुरू म.न.प.श्री संगनबसवेश्वर महाराज स्वामी यांच्या हस्ते भव्य सत्कार.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

------------------------------

समतेचे पुरस्कर्ते क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा लोहा न.पा.च्या प्रगणांत लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी बसविल्याबद्दल त्यांचा लोहा तालुक्यातील मौ. लांडेवाडी येथे धर्मगुरू शिवाचार्य म.न.प्र.श्री संगनबसवेश्वर महाराज स्वामी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.माहाराजानी भरभरून आशीर्वाद दिला.

यावेळी सरपंच बाळासाहेब टोपारे, उपसरपंच सचितानंद बल्लोरे जनार्दन लांडगे, यांच्या सहित मोठ्या संख्येने वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

 यावेळी सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले की, लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा ही माझी संकल्पना होती..

 यात लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा व लोहा न.पा. प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण ही लवकरच करण्यात येईल व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.

 तसेच लोहा शहरांची तहान भागवण्यासाठी लिंबोटी धरणाचे पाणी आणण्यासाठी ६६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

 तसेच जुना लोहा येथे लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न सोडविला लिंगायत स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून दिली.

 तसेच शहरात ४० ते ५० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते व नाल्या केल्या.

  लांडेवाडी येथील लिंगायत समाज बांधवांनी मला येथे बोलावून माझा मान सन्मान केला मी त्यांचा आभारी आहे लिंगायत समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदा तत्पर आहे असे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.