सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारूची विक्री करणाऱ्या ०३ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी केले दोन वर्षांकरिता तडीपार.

 सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारूची विक्री करणाऱ्या ०३ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी केले दोन वर्षांकरिता तडीपार.

------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर 

----------------------------


        सातारा जिल्हयामध्ये सातारा तालुक्यातील बोरगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने अवैद्य दारुची विक्री शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) शकीला गुलाब मुलाणी, वय ६० वर्षे, २) अमीर गुलाब मुलाणी, वय ३७ वर्षे, ३) समीर गुलाब मुलाणी, वय ३३ वर्षे, सर्व रा. टिटवेवाडी (देशमुखनगर) ता. जि. सातारा यांचेवर दुखापत पोचवून शिवीगाळ दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैद्य दारुची चोरटी विक्री करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गर्दी मारामारी करणेबाबतचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.आर, जी. तेलतुंबडे, सहा. पोलीस निरीक्षक, बोरगांच पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी किरणकुमार सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांनी केली होती.

     टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर वेळोवेळी त्यांचेवर अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा इसमांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

      वरील टोळीस मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

     नोव्हेंबर २०२२ पासुन १८ उपद्रवी टोळयांमधील ६१ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

     या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, बोरगांव पोलीस ठाणेचे पोहवा दादा स्वामी, पो.ना. प्रशांत चव्हाण, पोकों विशाल जाधव यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.