महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीमधील वेण्णा लेक, लायब्ररी रिन्यूशनच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा : किरण बगाडे.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीमधील वेण्णा लेक, लायब्ररी रिन्यूशनच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा : किरण बगाडे.
--------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा प्रतिनिधी
सुर्यकांत जाधव
--------------------------------
मा.चंद्रकांत पूलकुंडवार सो विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची मागणी.
उपरोक्त वरील विषयानुसार महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये अनेक विकास कामे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करण्यात आली शासनाचा भरघोस निधी मिळूनही वेण्णालेक तलाव विकासासाठी तसेच आजाखेर कितीनिधी वेण्णा लेक विकासासाठी तसेच देखभाल दुरुस्ती करण्यासाठी किती खर्च केला याचा खुलासा करावा तसेच वेण्णा लेक तलावाचे तसेच लायब्ररी रिन्यूशन च्या कामात दर्जाहीन मटेरिअल वापरल्याने सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित पर्यटन विभागाचा निधीचा गैरवापर तत्कालीन मुख्याधिकारी पल्लवी पाटील व सध्याचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संपूर्ण विकास कामाची SQM वरीष्ठ समिती गठीत करून अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी महाबळेश्वर नगरपालिकेतील कार्यालयामध्ये एकाच टेबलावर आर्थिक हितसंबंध जोपासत अनेक वर्ष अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी आर्थिक लागे बंद जोडून केले आहे त्यामध्ये बांधकाम अधिकारी नगर रचना अधिकारी ढोबळे व इतर अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी असे न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तीव्र धरणे आंदोलन करणार असा इशारा किरण बगाडे यांनी दिला
Comments
Post a Comment