राज्यात गुणवत्ता आणि कक्षाची स्थापना, माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षपदी.
राज्यात गुणवत्ता आणि कक्षाची स्थापना, माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षपदी.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
अमरावती प्रतिनिधी
पुंडलिक देशमुख
---------------------------------
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच निरीक्षण पद्धत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या अध्यक्षपदी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचे सबलीकरन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या यशस्वीतेमुळे उच्च शिक्षणाची गुणवत्ता व पाया यांचे सबलीकरण करण्यासाठी एक छत्री योजना अभियान स्वरूपात राबविण्याकरता केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान ही योजना १२व्या व१३व्या पंचवार्षिक योजने पासून राबविण्यात येत आहे. उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्व दूर संधी व समानता यावी यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्च प्रशिक्षण अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य प्रकल्प संचलनायक स्थापना करण्यात आली आहे. यात अध्यक्ष म्हणून शिक्षण तज्ञ डॉ भालचंद्र वायकर (संचालक इनोव्हेशन, इनक्युबॅशन आणि लीकेजेस डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) डॉ स्वाती शेरेकर (संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे) राहुल म्हात्रे (सहसंचालक, रुसा मुंबई) यांचा समावेश आहे. शासन आदेशात कक्षाच्या वतीने करण्यात येणारी दहा कार्य विशद करण्यात आली आहे. एन इ पी ची प्रभावी अंमलबजावणी करू असे डॉ येवले यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय पक्षाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली ही आनंदाची बाब आहे. माहिती, शिक्षण संवादाच्या माध्यमातून पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे काम करण्यात येईल. उच्च शिक्षणात रिफॉर्म्स आणण्याच्या दृष्टीने आगामी काळात कार्यरत राहील अशी प्रतिक्रिया डॉक्टर येवले यांनी व्यक्त केली. आमच्या महाराष्ट फ्रंट न्यूज चॅनलचे अमरावतीचे प्रतिनिधी पीएन देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली.
Comments
Post a Comment