विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.

 विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

------------------------------------

मार्गदर्शक करताना मा. अक्षय खोमणे, त्यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूजा लोखंडे, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, सल्लागार प्रा. डॉ. सुनील सावंत, डॉ. चंद्रकांत कांबळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात

 

दि. २ : आपल्या संविधानात समवर्ती सूचीचा अंतर्भाव आहे. याअंतर्गत वाहतुकीचे नियम येतात. वाई तालुक्यातील वाढते अपघातांचे प्रमाण ही काळजी वाढविणारी गोष्ट आहे. विशेषतः वेगावर नियंत्रण नसल्याने तरूणांकडून अपघात जास्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे प्रतिपादन सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय खोमणे यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रस्ता सुरक्षा जागर विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूजा लोखंडे, एन. एस. एस. चे सल्लागार अनुक्रमे प्रा. डॉ. सुनील सावंत, डॉ. चंद्रकांत कांबळे, तसेच कॅप्टन डॉ. समीर पवार, राजेंद्र पिसाळ प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात डॉ.अंबादास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.

 मा. खोमणे म्हणाले, वयोवृद्ध लोकांना इंद्रियांच्या क्षीणतेमुळे रस्त्यावरून चालताना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यांची काळजी आपण घ्यायला हवी. त्यांनी आपल्या भाषणातून अपघातांची आकडेवारी विद्यार्थ्यांसमोर मांडली. 

आपल्या मनोगतात मा. पूजा लोखंडे म्हणाल्या, दुचाकी व चारचाकी चालवताना वाहन परवाना, डोक्यावर हेल्मेट, सीटबेल्ट असणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या भाषणातून प्रश्नोत्तर पध्दतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून वाहतुकीच्या नियमांची माहिती करून दिली.

आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले, या दोन वक्त्यांनी दिलेली सर्व माहिती आत्मसात करून त्यांच्या अंमलबजावणीस स्वतःपासून सुरुवात करावी. वाऱ्याच्या वेगाने वाहन चालवणाऱ्या तरूणांनी इतरांच्या सुरक्षीततेचा विचार करावा. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे, विशाल महांगडे, जितेंद्र चव्हाण, सुमंत सावंत, महेंद्र भुजबळ व महेंद्र कोळी यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले, प्राची जगताप हिने पाहुण्यांची ओळख करून दिली, डॉ. अरूण सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले, कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमास नीलम भोसले , दीक्षा मोरे, राहुल तायडे व एन.एस.एसचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.