विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.
विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.
-----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------
अन्न औषध प्रशासन व गांधीनगर पोलीस ठाणे करते तरी काय.
गांधीनगर : - महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी जाहीर करुन महाराष्ट्रातून हद्दपार केलेला गुटखा गाधीनगर मध्ये विजय नावाच्या गुटखा किंगच्या माध्यमातून सहज सर्वत्र मोठ्या प्रमाणात पानपट्टी मध्ये राजरोसपणे विकला जात असून त्यांच्या शाखा कोठे कोठे सुरु आहेत याचा शोध गांधीनगर पोलीस व अन्न औषध प्रशासनाने घेतला तर लाखों रुपयांचा गुटख्याचे घबाड सापडू शकते
काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवेत असणाऱ्या या गुटखा किंग त्यांच्या टू व्हीलर गाडीवरून खुलेआम गुटखा पानपट्यामध्ये विकताना आढळतो त्यांची नेहमी गांधीनगर पोलीस ठाण्यात उठबस सुरु असते
काही पोलीस कर्मचाऱ्यांचा वरद हस्त असल्याने हा गुटखा किंग कायद्याला न जुमानता पत्रकारांशी अरेरावी करत कोण काय माझ वाकडं करू शकत नाही अशी उर्मट भाषा व पत्रकाराला धमकी देत असताना
आढळून येत आहे.
पोलिसांची असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे त्याची दैनिक सुपर भारत आवृत्ती संपादक,फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र व दैनिक रोखठोक चे कोल्हापूर जिल्हा क्राईम रिपोर्टर यांना धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे
गांधीनगर पोलिसांना हा गुटखा किंग माहीत असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही याबाबत जनमानसातून प्रतिक्रिया उमटत आहेत
Comments
Post a Comment