नवी मुंबई मध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच.
नवी मुंबई मध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच.
----------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
----------------------------
मनसे, आर. पी. आय कार्यकर्ते यांचा वंचित मध्ये जाहीर पक्षप्रवेश.
नवी मुंबई (बेलापूर ):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिलीप बंदिचोडे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील मनसे, आरपीआय पक्षातील पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहिर पक्ष प्रवेश बेलापूर येथील संकल्प भवन मध्ये पार पडला.
पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्ते यांनी येणाऱ्या काळात पक्षानी आम्हाला जी जिम्मेदारी दिली ते आम्ही पार पाडू असे आपल्या मनोगतमध्ये मांडले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी दोन्हीही तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.यामध्ये ॲड. उमेश हातेकर अप्पासाहेब हेगडे,अक्षय भंडगे,राहुल कांबळे,स्वप्निल येवले,अथर्व हेगडे,बबन कडेकर,सचिन मोहिते,सुजल वाघमारे,विनोद अंभोरे, अमलेश यादव या कार्यकर्ते यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये प्रवेश केला.
Comments
Post a Comment