नेमबाज गौरी संदीप कांबळे ची खेलो इंडिया शूटिंग चॅम्पियनशिप साठी निवड.
नेमबाज गौरी संदीप कांबळे ची खेलो इंडिया शूटिंग चॅम्पियनशिप साठी निवड.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर विभागीय दहा मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत गौरी संदीप कांबळे हिची निवड शिवाजी युनिव्हर्सिटी रायफल शूटिंग संघात झाली... व तीने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग कॉम्पिटिशन कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या 2023 24 या स्पर्धेमध्ये तिने शिवाजी युनिव्हर्सिटी चे प्रतिनिधित्व करताना सांघिक ज्ञानेश्वरी पाटील ,, ऐश्वर्या पवार व गौरी संदीप कांबळे या तिघांनी मिळून 1867.1 असा स्कोर करत ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी संघाचा सहावा क्रमांक आणला व त्यामधून त्यांची आसाम येथे होणाऱ्या
खेलो इंडिया शूटिंग चॅम्पियनशिप साठी निवड झाली आहे.... गौरी सध्या गांधीनगर निगडेवाडी येथील ड्रीम ओलंपियन रायफल अँड पिस्टल शूटिंग अकॅडमी मध्ये रायफल शूटिंग नेमबाजी प्रशिक्षणाचा सराव करत आहे..तिला... प्रशिक्षका आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू कु..अनुराधा महादेव खुडे व व ड्रीम ओलंपियन शूटिंग अकॅडमी चे संचालक समीर मुलानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिला वडील संदीप कांबळे व आई आरती कांबळे यांचे प्रोत्साहन तसेच गांधीनगर हायस्कूल गांधीनगर च्या मुख्याध्यापिका सुजाता जाधव मॅडम व क्रीडा शिक्षक सत्यजित कदम सर यांचे सहकार्य लाभत आहे..
Comments
Post a Comment