उचगावचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत दुर्गामाता.
उचगावचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत दुर्गामाता.
--------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------------------
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत फासेपारधी समाजाने प्रतिकूल परिस्थितीत बदल करत सर्वच क्षेत्रात केलेली प्रगती थक्क करणारी आहे. उचगावच्या विकासाचे रोल मॉडेल, महाराष्ट्रात नंबर वन ठरलेली शांतीनगरची फासेपारधी वसाहत सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. मंगळवार दि.६ रोजी येथील श्रद्धास्थान, आराध्य दैवत दुर्गामाता देवीचा यात्रेचा मुख्य दिवस. त्यानिमित्त...!
कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या उचगाव पूर्व येथील शांतीनगर वसाहत म्हणजे उचगावच्या विकासाची रोल मॉडल बनली आहे. ही वसाहत सिंगापूरसारखी देखणी आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत फासेपारधी समाजाने प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय वातावरणात समाजात सर्वांगीण बदल करत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात केलेली प्रगती थक्क करणारी आहे. समाजाच्या एकजुटीमुळे व वसाहतीचे सर्वेसर्वा माजी सरपंच गणेश काळे यांच्या नेतृत्वाखाली हा विकास घडला असून पर्यावरण, स्वच्छता वसाहत विकासाला प्राधान्य देत वेगळा आदर्श निर्माण करणारी फासेपारधी वसाहत महाराष्ट्रात नंबर वन ठरलेली आहे.माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांचा परिस स्पर्श लागल्याने वसाहतीचा सर्वांगीण कायापालट झाला आहे. आज मंगळ्वार दिनांक ६ रोजी येथील दुर्गामाता देवीचे यात्रेचा मुख्य दिवस आहे. दुर्गा माता यात्रा शाकाहारी करण्याचा क्रांतिकारक निर्णय समाजाने घेऊन तो आजतागायत पाळला आहे. देवीच्या दर्शनाबरोबरच येथील वेगळेपण जपलेल्या फासेपारधी समाजाचे कौतुक करण्यासाठी यात्रे दिवशी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. या वसाहतीचे माजी सरपंच गणेश काळे, माजी लोकनियुक्त सरपंच मालुताई काळे व त्यांच्या सहकार्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम व पाच हजार लोकांचा महाप्रसादाचे आयोजन केले आहे. पुजारी दिलीप काळे, जलाल काळे, मोहन काळे, व्यंकू चव्हाण यांनी पूजा बांधली आहे.कर्नाटकातील गदग येथे दुर्गामाता देवीची पहिली गादी तर दुसरी गादी उचगाव येथे आहे. दुर्गा मातेची मूर्ती ४५ वर्षापूर्वी आणून उचगाव शांतीनगर येथे प्रतिष्ठापना केली आहे.
***वसाहतीच्या व्यसनमुक्ती साठी महिलांनीच घेतला पुढाकार ***
वसाहती मध्ये व्यसनमुक्तीसाठी महिलांनी आता पुढाकार घेतला. सर्वांनीच दारूबंदी सह पूर्ण व्यसनमुक्तीची शपथ घेतली आहे. शपथ तोडणाऱ्या व्यक्तीस आता महिला कारवाई करणार आहेत. यामुळे वसाहतीत आता संपूर्ण व्यसनमुक्तीचे वातावरण बनले आहे. माजी लोकनियुक्त सरपंच मालु काळे यांच्या नेतृत्वाखाली वसाहतीतील संपूर्ण महिला यासाठी एकवटल्या आहेत. महिलांच्या या धाडसी निर्णयाचा उचगाव सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.
समाजाचे एकमुखी नेतृत्व गणेश काळे यांनी दारूबंदी, शाकाहारी यात्रा महिलांना प्रोत्साहन, अद्ययावत घरकुल, वृक्षारोपण, सांस्कृतिक हॉल रस्ते, पदपथ, व्यायामशाळा, क्रीडांगण अशी देखणी वसाहत निर्माण केली आहे व समाजाची प्रगती साधली आहे.
विकासासाठी आतापर्यंत वसाहत तसेच सरपंच यांना ज्ञानज्योती दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार तसेच हिंदवी आदर्श सरपंच पुरस्कार जन स्वास्थ दक्षता समिती यांच्या वतीने आदर्श वसाहत तर करवीर तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कारासह निर्मल ग्राम पर्यावरण विषयक पुरस्कार राजश्री शाहू समता पुरस्कार असे विविध मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत, वसाहतीत प्रवेश करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नावाची सुंदर कमान तसेच नेपाळी पद्धतीने बांधलेले हनुमान मंदिर, दुर्गामाता, सतमरगाई मंदिर, समाज मंदिर, शाळा वसाहतीत आहे. यात्रेचे संयोजन माजी सरपंच गणेश काळे, मालुताई काळे, रवी काळे, सुरेश चव्हाण, राजू काळे,, मदन चव्हाण, मारुती चव्हाण, अनिल चव्हाण, मारुती पोवार, दिलीप चव्हाण ,आप्पा काळे, सचिन काळे, तानाजी पोवार, बाळू चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, गणेश चव्हाण, आप्पा चव्हाण, शिवाजी काळे, राजू चव्हाण, शिवतेज काळे,साईराज काळे, आदित्य चव्हाण,सुनील पोवार बाजीराव पोवार , अभिजीत जाखले यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment