मौजे वडगाव च्या उपसरपंच पदी रघुनाथ गोरड यांची बिनविरोध निवड.
मौजे वडगाव च्या उपसरपंच पदी रघुनाथ गोरड यांची बिनविरोध निवड.
---------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
मौजे वडगांव
भुपाल कांबळे .
---------------------------------
मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत मध्ये माजी उपसरपंच सुनील खारेपाटणे यांनी रोटेशन पद्धतीने एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने सरपंच सौ. कस्तुरी पाटील यांच्याकडे राजीनामा दिला होता त्यानंतर रिक्त झालेल जागी निवडी करीता विशेष सभा बोलावण्यात आली होती त्यावेळी श्री. रघुनाथ यशवंत गोरड यांची सरपंच सौ. कस्तुरी पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. त्यानंतर मावळते उपसरपंच सुनील खारेपाटणे यांनी त्यांना सन्मानाने आसनस्थ केले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, सुनील खारेपाटणे स्वप्नील चौगले, नितीन घोरपडे, सुनीता मोरे,सविता सावंत,दिपाली तराळ, सुवर्णा सुतार, मीनाक्षी अकीवाटे,सूरेश काबरे, मधुमती चौगुले मौजे वडगाव मधील नागरीक व आघाडी प्रमुख उपस्थित होते
Comments
Post a Comment