भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार दिनांक १७ रोजी सकाळी ११ वाजता गारगोटी येथे रास्ता रोको.
भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार दिनांक १७ रोजी सकाळी ११ वाजता गारगोटी येथे रास्ता रोको.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भुदरगड प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
---------------------------------------
भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी १७ रोजी सकाळी ११ वाजता गारगोटी येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे .अशी महिती कॉम्रेड सम्राट मोरे यानी दीली. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आमरण उपोषनाला बसले आहेत .त्यांचा आज ७ दिवस आहेत त्यांनी त्यांची प्रकृती खालावली आहे तरीही सरकार याकडे लक्ष देत नाही .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अधिवेशनात गुंग आहेत.आमचा मराठी लढाऊ नेता मारणाऱ्या दारात उभा आहे तरीही सगे सोयरे या शब्दाचा कायदा त्वरित करावा या मागणी साठी उपोषणला बसले आहेत. अखंड महाराष्ट्र या उपोषणाकडे बघत आहे तरी तात्काळ अध्यादेश काढून राज्य सरकारने याची दखल घ्यावी . यावेळी सकल मराठा समाजाचा वतीने भुदरगड पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले .
यावेळी तुकाराम देसाई ,सचिन भांदीगरे ,संतोष पार्टे,रमेश माने,मनोहर आबिटकर,आनंद देसाई,सुरेश पाटील ,सतीश जाधव,शिवाजी डावरे,अभिमन्यू दंडवते, मच्छिंद्र मुगडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते .
Comments
Post a Comment