केशवनगर येथे दहा लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न.
केशवनगर येथे दहा लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
------------------------------
रिसोड तालुक्यातील रिसोड मालेगाव रोडवरील ग्रामपंचायत केशवनगर येथे काल दिनांक २२/२/२०२४ रोजी दुपारी चार वाजता पंचवीस पंधरा अंतर्गत दहा लाख रुपयांच्या रस्त्याचाभूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला ,या कामाचे उद्घाटन भाजपाचे रिसोड मालेगाव निवडणूक प्रमुख नकुलदादा देशमुख यांच्या हस्ते पार पडले यावेळी मान्यवरांनी कुदळ मारून रस्त्याच्या भूमिपूजनाच्या शुभारंभ पार पडला ,त्यानंतर ग्रामपंचायत केशवनगर व गावकऱ्यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवनगर येथील ग्रामपंचायत पॅनलचे अध्यक्ष श्री शिवाजीराव सरनाईक होते, यावेळी उद्घाटक नकुल दादा देशमुख यांचा व मान्यवरांचा ग्रामपंचायत च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचे वाशिम जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे ,रिसोड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषराव खरात ,गोवर्धन जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम तहकीक, पंचायत समिती सदस्य भूषण पाटील दांदडे, भाजपाचे पांडुरंग जाधव, युवा मोर्चाचे प्रशांत वाघ, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नकुल दादा देशमुख यांनी केशवनगरला अजूनही निधी देण्याची ग्वाही दिली यावेळी पुरुषोत्तम तहकीक यांनी केशवनगर साठी 15 लाख रुपयांचा जिल्हा परिषद मधून निधी देऊन तात्काळ कामे सुरू केल्यानंतर यावेळी गावासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले, या कार्यक्रमासाठी सरपंच आखाडे सर, शिवाजीराव सरनाईक, प्रल्हाद पुरी, गजानन बाजड, वसंतराव मांदळकर, विजय खोटे, नितीन डोंगरदिवे, डॉक्टर शाम तहकीक ,डॉक्टर दत्तराव देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पाटील सरोदे, सुरेश राजे जाधव ,शिंदे साहेब ,दुर्गेश अग्रवाल ,सोनू चौधरी, गोरोबा मामा रोहिदास धबडघाव, ढाले मामा यांच्यासह केशवनगर येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा, उपसरपंच गजानन बाजड यांनी केले
Comments
Post a Comment