भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी उपदेश सिंह यांची निवड..!!

 भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी उपदेश सिंह यांची निवड..!!

---------------------------

फ्रंटलाईन न्युज  महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी

----------------------------

भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीच्या (कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम विभाग) अध्यक्षपदी उपदेश रवींद्र सिंह यांची निवड एकमताने करण्यात आली. या निवडीचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १५ फेब्रुवारी २०२४) रोजी देण्यात आले.


यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष पश्चिम राहुल बजरंग देसाई, राहुल चिकोडे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




या निवडीनंतर उत्तर भारतीय समर्थक समाज बांधवांनी एकच जल्लोष केला. निवड झाल्यानंतर त्यांच्यावर मित्र परिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समाजाचे प्रदेश सचिव डॉ. सुरेंद्र सिंह, अजय सिंह, अजित सिंह, राहुल चौबे, शिवकुमार सिंह, डॉ. अभिलाष सिंह,, उधीर दुबे, रविकांत त्रिपाठी, बबलू गुप्ता आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.