रिसोड येथील सार्वजनिक शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार संतोष च-हाटे.
रिसोड येथील सार्वजनिक शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार संतोष च-हाटे.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-------------------------------------
(शिवजयंती निमित्त मोटारसायकल रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन)
रिसोड....छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त रिसोड शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती समितीचे आयोजन करण्यात आले आसुन शहराच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष पदाचा बहुमान हा पत्रकाराला मिळालेला आहे.शिवजयंती निमित्त शहरातील मोटारसायकल रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष पत्रकार संतोष च-हाटे यांनी केले आहे.
रिसोड शहरातील सर्व उद्योजक,व्यापारी,नागरिक,नोकरदार,वर्ग प्रत्येक वर्षी मोठ्या उत्सहात शिवजयंती साजरी करतात.परंतु वेगवेळ्या ठिकाणी शिवजयंती साजरी करतांनी कायदासुव्यवस्थेची मोठ्या प्रमाणावर त्रेधात्रिपीट उडत आसल्याने मागील काही वर्षांपासुन शहरा मध्ये सार्वजनिक शिवजयंती चे आयोजन करण्यात येत आहे.यावेळी सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आसुन सर्वानुमते अध्यक्ष पदी पत्रकार संतोष च-हाटे यांची निवड करण्यात आलेली आहे.शिवजयंती साजरी करतांनी मोटारसायकल रॅली,डिजेच्ये निनाद साजरी करण्यात येणार आसुन मिरवणूकीतील डिजे चे आवाज हे पोलिस विभागाने ठरवुन दिलेल्या विशिष्ट डेसीबल मध्ये ठेवण्याचे आवाहण अध्यक्ष च-हाटे यांनी केले आहे.विशेष म्हणजे आयोजित शिवजयंतीला सर्व जाती धर्मातील युवक,जेष्ठांनी सहभाग घेण्याचे आवाहन च-हाटे यांनी केले आहे.शिवजयंतीची सार्वजनिक मिरवणूक ही छत्रपती शिवरांच्या विचारधारेला अनुसरून संपन्न होणार आहे.हे .
Comments
Post a Comment