एस. टी. बसवर दगडफेक प्रकरणी एका अल्पवयीन सह तिघे ताब्यात.
एस. टी. बसवर दगडफेक प्रकरणी एका अल्पवयीन सह तिघे ताब्यात.
-------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------------
दसरा चौक कोल्हापूर येथे दिनांक 31 रोजी दगडफेक करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह तीन समाजकंटकांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . यावेळी एसटी बस काही चार चाकी वाहनावर दगडफेक केली त्यामध्ये ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय सोनेवाडी जि. अहमदनगर या शाळेची सहल घेवून जाणारी एस. टी. बस (क्र. एमएच 20 - जीसी 2543,) व चारचाकी मारुती सेलेरो (क्र. एमएच 10-सीएक्स 5565) या गाडयांच्या काचा फुटुन सुमारे 30,000/- रुपयाचे नुकसान झाले तसेच एस. टी. बस मधील दोन विद्यार्थी जखमी झाले. सदरबाबत अनोळखी इसमांचे विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे सार्वजनिक संपतीस हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अशा प्रकारची घटना घडणे हे चुकीचे असलेने त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना वाहनावर दगडफेक करणारे इसमांचा शोध घेवून त्यांना तात्काळ ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले. वरिष्ठांनी दिले सुचनाप्रमाणे पो.नि. रविंद्र कळमकर यांनी स्था.गु.अ. शाखेकडील दुय्यम पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांचेसह आपण स्वतः नमुद गुन्हयाचा समांतर तपास करुन गोपनीयरित्या माहिती मिळवून तसेच तांत्रीक दृष्टया तपास करुन नमुद गुन्हयाचे तपासकामी दि.01 राजी रात्रौ उशीरा जाफर मंजूर सिनदी, (वय- 20 ) , सुबेध शमशुद्दीन मुजावर,( वय-27,) ( दोघे राहणार सी वॉर्ड, सोमवार पेठ, अकबर मोहल्ला, कोल्हापूर) व एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेले जाफर मंजूर सिनदी,सुबेध शमशुद्दीन मुजावर व एक अल्पवयीन मुलगा यांना अधिक तपासाकरीता लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे येथे हजर केले.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार यानी केली आहे.
Comments
Post a Comment