यशाचा शॉर्टकट नसतो : संजय साबळे.
यशाचा शॉर्टकट नसतो : संजय साबळे.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
--------------------------
तिलारी (चंदगड )
"ज्याचा वर्तमान काळ आखीव असतो त्याचा भविष्यकाळ रेखीव असतो आयुष्यात सावकाश चाला हरकत नाही पण चालनाना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मनमिळावू स्वभावाची आत्मीक समाधान लाभलेल्या मनाची आणि दैदिप्यमान यशाची पावले सदैव मागे उमटली पाहिजे . यासाठी दैनंदिन जीवनातून सात्वीक विचार , कृती घडणे आवश्यक आहे . *यशाला शॉर्टकट नसतो* . प्रयत्न हेच त्याच्यावर औषध आहे " असे प्रतिपादन दि न्यू इंग्लिश स्कूल चे अध्यापक संजय साबळे यांनी केले . ते माऊली विद्यालय तिलारी येथील दहावी विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक केले . मुख्याध्यापक एम . पी .काटकर यांनी प्रास्ताविक केले .पाहुण्यांचा परिचय विठ्ठल बेनके यांनी करून दिला . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कोदाळीच्या . सरपंच योगिनी दळवी होत्या . यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांची मनोगते झाली .यावेळी माजी मुख्याध्यापक सातर्डेकर , लाडकु दळवी यांनी वैचारिक मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी तर आभार ए एन पाटील यांनी मानले .
Comments
Post a Comment