बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक.
बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक.
----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------------
तब्बल 34.88 लाखाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त.
बांबवडे (ता शाहूवाडी) येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सापळा रचून गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडून 34.88 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सदरची कारवाई गुरुवारी ( ता. १) रोजी करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची अवैध व्यवसायाचे अनुषंगाने माहिती काढून कायदेशीर कारवाई करणे करीता पथके तयार केली. बांबवडे, ता. शाहुवाडी मार्गे रत्नागिरीकडे अवैध गुटख्याची वाहतुक होणार असलेची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे यांना माहिती मिळाली. सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव यांचे पथकाने बांबवडे, ता. शाहुवाडी येथे कोल्हापूर ते मलकापूर जाणारे रोडवर सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतुक करीत असताना संजय कृष्णा खपले, (व.व.48, रा. भैरी रोड, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) व शरद केशव लिंगायत (व.व. 42, रा. केळे मजगांव, ता. जि. रत्नागिरी) यांना त्यांचे ताब्यातील आयशर टैम्पो गाडी ( नं. एमए-09- जीएफ- 7099 ) सह पकडले. सदर गाडीमध्ये वी 1 कंपनीचा पानमसाला व तंबाखुची पाकीटे असा 12,68,000/- रुपये किंमतीचा गुटखा, 100 क्विंटल काळा गुळ, आयशर गाडी व इतर साहित्य असा एकूण 34,88,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिल आरोपीं विरुध्द शाहुवाडी पोलीस ठाणे येथे अन्न व सुरक्षा मानदे कायदा कलम 59,63 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना दि. ०५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे हे करीत आहेत. .
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव तसेच पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, संजय पडवळ, युवराज पाटील, दिपक घोरपडे, सोमराज पाटील, अमित मर्दाने, संतोष पाटील, यशवंत कुंभार यानी केली आहे.
Comments
Post a Comment