लोह्यातील महापुरुषांच्या पुतळा अनावरण फलकावरील नावे काढून शासन नियमानुसार फलक लावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू - एकनाथ पवार यांचा इशारा.
लोह्यातील महापुरुषांच्या पुतळा अनावरण फलकावरील नावे काढून शासन नियमानुसार फलक लावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू - एकनाथ पवार यांचा इशारा.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
------------------------------
लोहा शहरातील शिवप्रेमींची मागील अनेक वर्षापासूनची शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची मागणी होती. अनेकांनी विविध मार्गाने आंदोलन करून लढा दिला. त्यानंतर शहरातील मुख्य चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. तसेच पालिका प्रांगणात महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारला. परंतु त्याठिकाणी लावण्यात आलेले अनावरण फलक हे शासन नियमानुसार न लावता नांदेडच्या खासदाराने स्वतःच्या कुटुंबातील नावे असलेले फलक लावण्यात आले. सदरील फलक तत्काळ हटविण्यात येवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा (उबाठा) शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी दिला आहे.
लोहा शहर परिसरातील शिवप्रेमींनी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून उभारण्यासाठी घेवून जाताना प्रशासनाच्या मार्फत तो अडविण्यात आला आणि पालिका प्रशासनाच्या वतीने स्वतः जबाबदारी घेवून नवीन पुतळा खरेदी करून नियोजित ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसविला. तसेच लोहा नगर पालिका प्रांगणात महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. सदरील पुतळ्याच्या अनावरण फलकावर खासदाराने स्वतःचे, मुलांचे नावे छापून घेतले. सदरील नावे टाकताना शासन नियमाला बगल दिली. यासंदर्भात लोहा पालिकेचे मुख्याधिकारी व तहसिलदार यांची भेट घेवून सदर नावे असलेले फलक तत्काळ काढून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा उबाठा शिवसेनेचे नेते एकनाथ दादा पवार यांनी दिला आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही लोहा कंधार मतदारसंघातील अनेक गावं खेड्यात कुठलीच सोई सुविधा नाही, रस्ते नाहीत, पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थिती, शिक्षणाची सुविधा नाही. आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी या भागातील मतदारांना विकासाच्या नावाने भूलथापा देवून मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवून केवळ घराणेशाही सुरू ठेवली. मतदार संघातील घराणेशाही संपवून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आलो असून रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याबद्दल मी शिवसेनेचा असलो तरी नितीन गडकरी यांचे कौतुक करतो. असेही पवार म्हणाले.
यावेळी माजी जि. प. सदस्य बालाजी परदेशी, सुभाष पाटील भालेराव, निळ्याचे सरपंच गजानन मोरे, भारसवाड्याचे सरपंच नवनाथ पाटील हालगे, मंगरूळचे सरपंच वसंत पाटील शिंदे, हिप्परगाचे सरपंच बालाजी पाटील पवार, व्यंकटराव आढाव, पंडित पाटील फाजगे, युवा सेनेचे गजानन कराडे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment