Posts

Showing posts from February, 2024

सावर्डे खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात.

Image
सावर्डे खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कागल प्रतिनिधी कृष्णात मालवेकर -------------------------------------- सावर्डे खुर्द तालुका कागल संयुक्त गावभाग मंडळाची छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती  सावर्डे. मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.दिलीप मालवेकर,उप.अध्यक्ष अजिंक्य कदम व खजिनदार मा. बंबू मालवेकर यांच्या हस्ते रथातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सदरील मिरवणुकीत  आकर्षक आतिषबाजी व शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. सदरील जयंती सोहळ्यात गावातील सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी झाले होते.               शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गावात भगव्या कमानी उभारण्यात येवून ध्वनिक्षेपकावरून शिवरायांचे स्पुर्ती गीते वाजविण्यात येत होती. सावर्डे खुर्द  हे भगवेमय झाले होते.               मिरवणुकीत युवा उद्योजक मा.श्री. नवनाथ लिंगडे , शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख मा.दादाराव मालवेकर ,अभी मालवेकर, सुशांत मालवेकर, संयुक्त गाव

अखेर वाकद येथिल शादीखान्याचे काम सुरु?

Image
  अखेर वाकद येथिल शादीखान्याचे काम सुरु? -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर -------------------------------- वंचितच्या आंदोलनाचा प्रशासनाने घेतला धसका. तालुक्यातील वाकद येथिल अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्यांक निधीतून शादीखाना मंजूर करण्यात आला. शादीखाना मंजूर होऊन त्यासाठी निविदा बोलावून अवश्य प्रक्रिया सुद्धा सहा महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आली होती परंतु ज्या ठेकेदाराला काम देण्यात आले त्याने अद्यापपर्यंत काम सुरूच केले नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकील यांनी प्रशासनाला 27 फेब्रुवारी मंगळवारला निवेदन देऊन काम का सुरु झाले नाही व कधी होणार याची विचारणा केली होती. त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अनेकवेळा विचारपूस केली असता केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळकाढू धोरण अवलंबिल्यामुळे सय्यद अकील यांच्या नेतृत्वात 27 फेब्रुवारी ला उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रिसोड यांना प्रा. रंगनाथ धांडे,मोहम्मद असिफ, सदानंद गायकवाड,सुनील इंगळे केनवड,श्रीकांत वाकुडे, हाजी सय्यद रमजान, सय्यद नाजीम, मौसीन खान दौलतखान,

अधिकऱ्यांची मजा युवकांना सजा.

Image
  अधिकऱ्यांची मजा युवकांना सजा. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  नवी प्रतिनिधी रवि पी. ढवळे  ---------------------------- पनवेल तहसील कार्यालयात मनमानी कारभारामुळे शेकडो युवकांचे डोमेसाईल अडकले. पनवेल :- पनवेल तहसील कार्यालयात असणारे अधिकारी चार ते पाच दिवसापासून रजेवर असल्याने त्यांनी आपला चार्ज दुसऱ्याला न देता थेट सुट्टीवर गेल्याने भरतीसाठी मुलांना डोमोसाईल (अधिवास प्रमाणपत्र )वेळेवर न मिळाल्याने हाती आलेली नौकरी हातातून जाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवलेय. पनवेल तहसीलदार यांनी लवकरच काही तरी उपाययोजना करा अन्यथा एखादा युवक आपल्या जीवाचं बरं वाईट करायला मागे पाहणार नाहीत आणि हे रोखयच असेल तर योग्य कारवाई करा अशी चर्चा पनवेल तहसीलदार कार्यालयात सुरु आहे.....*

मौजे वडगाव च्या उपसरपंच पदी रघुनाथ गोरड यांची बिनविरोध निवड.

Image
  मौजे वडगाव च्या उपसरपंच पदी रघुनाथ गोरड यांची बिनविरोध निवड. --------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र मौजे वडगांव  भुपाल कांबळे . ---------------------------------         मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत मध्ये माजी उपसरपंच सुनील खारेपाटणे यांनी रोटेशन पद्धतीने एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने सरपंच सौ. कस्तुरी पाटील यांच्याकडे राजीनामा दिला होता त्यानंतर रिक्त झालेल जागी निवडी करीता विशेष सभा बोलावण्यात आली होती त्यावेळी श्री. रघुनाथ यशवंत गोरड यांची सरपंच सौ. कस्तुरी पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. त्यानंतर मावळते उपसरपंच सुनील खारेपाटणे यांनी त्यांना सन्मानाने आसनस्थ केले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, सुनील खारेपाटणे स्वप्नील चौगले, नितीन घोरपडे, सुनीता मोरे,सविता सावंत,दिपाली तराळ, सुवर्णा सुतार, मीनाक्षी अकीवाटे,सूरेश काबरे, मधुमती चौगुले मौजे वडगाव मधील नागरीक व आघाडी प्रमुख उपस्थित होते

नव मतदार नोंदणी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार.

Image
 नव मतदार नोंदणी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार. ------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------------- महाराष्ट्र शासन निवडणूक विभाग व शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने 2023 वर्षांमधील निवडणूक साक्षरता मंडळ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मत अधिकार लोकशाही त्या संदर्भातील केलेली जागृती नाविन्यपूर्ण उपक्रम नव मतदान नोंदणी व इतर उपक्रमातील उत्कृष्ट सहभाग या संदर्भातील, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार नुकताच शिवाजी विद्यापीठ येथे तसेच राधानगरी महाविद्यालय कॅम्पस ॲम्बेसिडर कुमार गणेश पाटील यांना उत्कृष्ट कॅम्पस अम्बिसिडर पुरस्कार अशा दोघांना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे शिवाजी विद्यापीठ चे प्रभारी कुलगुरू प्रमोद पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गायत्री पाटील व वृषाली महाजन यांचा सत्कार.

Image
  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गायत्री पाटील व वृषाली महाजन यांचा सत्कार. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी   रणजीत ठाकूर --------------------------------- स्थानिक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात 27 फेब्रुवारी मंगळवारला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रसंगी गायत्री सुभाष रंजवे पाटील व वृषाली सिद्धेश्वर महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डॉ विनोद कुलकर्णी प्राचार्य उत्तमचंद बगाडिया माहाविद्यालय रिसोड,जेष्ठ साहित्यिक व नाटककार रामचंद्र भावसार, कृषी तज्ञ संजय उकळकर, सत्कारमूर्ती वृषाली महाजन व गायत्री पाटील इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयचे संस्थापक प्रा. कमलाकर टेमधरे यांनी केले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते वृषाली महाजन व गायत्री पाटील यांचा त्यांच्या परिवारातील सदस्यांसह सत्कार करण्यात आला.सर्वेश प्

रिसोड येथे श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतीथी उत्साहात साजरी.

Image
  रिसोड येथे श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतीथी उत्साहात साजरी. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनीधी रणजीत ठाकूर ------------------------------------  येथील सोनारा समाजाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतीथी कार्यक्रमाचे आयोजन संत सातारकर महाराज संस्थान मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अरुणराव काटोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. कृष्णाआप्पा आसनकर, गणेश सेठ बगडीया, रामभाऊदादा काटोले, कमलाकर टेमधरे, विष्णुपंत चाकोतकर, राजुभाऊ साखरकर, रामकृष्ण काटोले, शंकरभाऊ वर्मा, अरुणभाऊ शहाने, प्रल्हा सावळकर, माजी नगराध्यक्ष यशवंतराव देशमुख, महादेवराव बुट्टे, गजानन बानोरे, मधुकर चाकोतकर उपस्थित होते.   सर्वप्रथम व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते श्री संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन महाआरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले. व्यासपिठावरील मान्यवरांचा आयोजकाच्या वतीने पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना माजी प्राचार्य कमलाकर टेमधरे म्हणाले की, शहरा

स्वामी विवेकानंद विद्यालय व्याड येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.

Image
स्वामी विवेकानंद विद्यालय व्याड येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकूर -------------------------------- तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्य. व उच्च माध्य. विद्यालय व्याड येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक जे पी भिसडे तर प्रमुख मार्गदर्शक शिक्षिका कु. दुर्गा घोगरे, प्रा. प्रवीण सरनाईक, रवि अंभोरे,जी एस घाटोळ, आर आर पवार उपस्थित होते.डॉ सी व्ही रमण यांच्या रमण परिणाम या शोध प्रबंधमुळे जागतिक स्तरावर विज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली त्यामुळे रमण यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारत देशात 28 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जात असल्याचे आपल्या प्रास्ताविक मनोगतातून जी एस घाटोळ यांनी व्यक्त केले. तर दैनंदिन जीवनात आजच्या युगात सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत विज्ञानाचा संबंध येतो असे मनोगत दुर्गा घोगरे यांनी व्यक्त केले. तर प्रवीण सरनाईक यांनी विज्ञान हे दुधारी शस्त्र असून ते कसे वापरावे याचे आकलन असणे गरजेचे आहे.वैज्ञानिक संशोधणाचे जेवढे फायदे तेवढेच तोटे सुद्

जरांगे यांच्या समर्थनार्थ मुदाळतिट्टा येथे रास्तारोको वेळी तासभर वाहतूक व्यवस्था ठप्प.

Image
  जरांगे यांच्या समर्थनार्थ मुदाळतिट्टा येथे रास्तारोको वेळी तासभर वाहतूक व्यवस्था ठप्प. मराठा आरक्षणप्रश्नी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी समाजबांधवाच्या वतीने मुदाळतिट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सुमारे एक तास गारगोटी-कोल्हापूर राज्य मार्ग रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.        यावेळी आंदोलकांनी आपली भूमिका मांडली. आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र काही ठराविक नेतेमंडळी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न मराठा समाज कदापी यशस्वी होऊ देणार नाही. मंत्री छगन भुजबळ, आम. गोपीचंद पडळकर, निलेश राणे, गुणरत्न सदावर्ते ही मंडळी आपली किंमत वाढवण्याच्या हेतूने मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत असून अशा नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही आंदोलकांनी केली. या रास्ता रोको कागल राधानगरी भूदरगड तालूक्यातील अनेक मराठा बांधव उपस्थीत होते        रास्तारोको झाल्यानंतर  मागणीचे निवेदन मुरगुडचे सपोनि शिवाजी करे, गारगोटीचे सपोनि सचिन

सातारच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट मध्ये वाईच्या किसन वीरच्या बी.सी.ए च्या मुलांचा डंका.

Image
  सातारच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट मध्ये वाईच्या किसन वीरच्या बी.सी.ए च्या मुलांचा डंका. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  वाई प्रतिनिधी कमलेश ढेकाणे  --------------------------------- वाईः सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये राज्यस्तरीय तंत्रज्ञान TECH++ 2K24” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर, तसेच सोलापूर व पुणे अशा अन्य जिल्ह्यातून विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये सी प्लस प्लस प्रोग्रामिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, पी.पी.टी. प्रेझेंटेशन, टेक्नो क्विज इत्यादी प्रकारच्या विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये किसन वीर कॉलेज मधील बी.सी.ए विभागातील २८ विध्यार्थी विविध स्पर्धेत सहभागी झाले होते. यापैकी पी.पी.टी. प्रेझेंटेशन मध्ये रोषण शिर्के याचा प्रथम क्रमांक आला. पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये अमृता घाटे आणि सुमित बाबर यांचा प्रथम क्रमांक आणि प्रणव महागावकर आणि किरण पांगारे या

किसन वीर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.

Image
 किसन वीर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  --------------------------------- वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन ग्रंथदिंडी, पुस्तक व भित्तीपत्रक प्रदर्शन, तसेच विशेष व्याख्यान अशा उपक्रमांनी उत्साहात संपन्न करण्यात आला. “मराठी भाषा हे आपले सांस्कृतिक वैभव असून तिचे जतन, संवर्धन आणि विकास करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे”, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहायक सरोजकुमार मिठारी यांनी केले.  येथील किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत, प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रा. डॉ. विनोद वीर, मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ . धनंजय निंबाळकर, डॉ. संग्राम थोर

लोह्यातील गाडगे महाराज प्राथमिक शाळेत रंगले चिमुकल्यांचे स्नेह संमेलन.

Image
  लोह्यातील गाडगे महाराज प्राथमिक शाळेत रंगले चिमुकल्यांचे स्नेह संमेलन. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा तालुका प्रतिनिधी  अंबादास पवार   --------------------------------------   शहरातील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन दि. २७ रोजी मंगळवारी पार पडले. चिमुकल्यांच्या विविध कलागुण दर्शनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.              संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील बालवाड़ी पासून इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मंगळवारी दि. २७ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांनी निव्वळ अभ्यासात गुंतून न रहाता खेळ, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी मध्ये सहभागी व्हावे. त्यांच्यातील असलेले सुप्त कलागुण, आविष्कार यांचे सादरीकरण होवून त्यांनी मोकळा श्वास घ्यावा. या उद्दात हेतूने शाळा प्रशासनाच्या वतीने प्रतिवर्ष स्नेसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी शाळेच्या प्रांगणात चिमुकल्यांनी विविध गीतावर नृत्याचे उत्कृष्ठ सादरीकरण केले.  विद्यार्थ्यांनी विविध गी

शिवचरित्राचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास साधावा. डॉ. दिपक जाधव.

Image
  शिवचरित्राचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास साधावा. डॉ. दिपक जाधव. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  वाई प्रतिनिधी कमलेश ढेकाणे  ---------------------------  छत्रपती शिवाजी महाराजाचे चरित्र निरंतर दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे. त्याच्या कार्यातून, योगदानातून बोध घेऊन आपला व्यक्तिमत्व विकास साधावा असे प्रतिपादन डॉ. दिपक जाधव यांनी केले. ‘शिवजयंतीनिमित्त किसन वीर महाविद्यालयातील इतिहास विभाग, आयक्यूएसी व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.                  डॉ.दिपक जाधव पुढे म्हणाले की, आज शिवचरित्र केवळ इतिहास या विषयापुरते आपण सीमित करून ठेवले आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र विद्यार्थी फारसे वाचत नाहीत. शिवचरित्रातील विविध पैलूंवर नव्याने आकलन, संशोधन होणे गरजेचे आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष भावनेने राज्यकारभार करणारे राजे होते. व्यक्तीपेक्षा गुणीजनांचा प्रशासनात समावेश, व्यवस्थापकीय कौशल्य, किल्ला, न्याय प्रशासन, कमीतकमी साधनसंपत्तीचे सुयो

सातारा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. लोकांची नजर चुकवून दिवसा घरातून चोरी करणारा चोरटा गजाआड.. आरोपीकडून ३ मोबाईल, १ लॅपटॉप, मोटारसायकल असा एकूण १,३५,०००/- रुपयेचा ऐवज हस्तगत.

Image
  सातारा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. लोकांची नजर चुकवून दिवसा घरातून चोरी करणारा चोरटा गजाआड.. आरोपीकडून ३ मोबाईल, १ लॅपटॉप, मोटारसायकल असा एकूण १,३५,०००/- रुपयेचा ऐवज हस्तगत. --‐----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी अमर इंदलकर  --‐-----------------------------  सातारा शहरातील गोडोली येथील रहाते घरातून व एम.आय.डी.सी सातारा येथील एका ट्रेनिंग सेंटरचे ऑफिसमधून अशा दोन ठिकाणाहून एका चोरट्याने दिवसाचे वेळी तेथील लोकांची नजर चुकवून मोबाईल व लॅपटॉपची चोरी केली होती. सदर चोरीबाबत सातारा शहर पोलीस ठाणेस दोन चोरीचे गुन्हे नोंद करण्यात आलेले होते.      मा. पोलीस अधिक्षक श्री समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा.उप. वि. पोलीस अधिकारी श्री किरणकुमार सुर्यवंशी, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस स्टेशन डी.बी. पथकाचे अधिकारी व पोलीस स्टाफने तांत्रिक माहितीचे व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त केली की, सदरचा चोरटा दत्तात्रय उर्फ योगेश नंदकुमार खवळे वय 23 वर्षे रा. बौद्ध वस्ती को

बेलखेडा येथे समाज कल्याण विभागाच्या विविध योजणेची जनजागृती.

Image
  बेलखेडा येथे समाज कल्याण विभागाच्या विविध योजणेची जनजागृती. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   रिसोड प्रतिनिधी                                              रणजीत ठाकूर. ---------------------------------  रिसोड तालुक्यातील बेलखेडा येथे. समाज कल्याण विभागाच्या वतीने. मनोरंजणातुन प्रबोधणातुन विवीध योजणेची माहीती देऊन जनजागृती करण्यात आली.वाशिम जिल्ह्यातील साहीत्य रत्न अणाभाऊ साठे कला व क्रीडा बहु संस्था जांबरुन महाली यांनी सदर माहीती दिली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माणिकराव बांगर. तर सचिव बेबीताई कांबळे. विदर्भातील गायिका वंदनाताई भगत. रवि जोंगदंड. मुरलीधर पटे्बहादुर. गणा खंडारे. शिधार्थ भगत. यांनी सर्व शासकीय विवीध योजणेची गावकऱ्याना माहीती दिली. व मनोरंजनातून जनजागृती केली. समाजकल्याण विभागाच्या योजणेची मनोरंजनातून प्रबोधात्माक माहीती देण्यासाठी जिल्हा माहीती कार्यालय वाशिमच्या वतीने. सन-- २०२३-- २४ या वर्षात. सदर कलाकाराच्या वतीने. वाशिम जिल्ह्यातील गावागावात कलापथक मनोरंजनातून विवीध शाज्ञकीय योजणेवर सविस्तर सर्व  योजणे बद्दल माहिती माहिती दिली. बेलखेडा येथ

केशवनगर - येथे. नवयुवक.. व युवती बेरोजगार मार्गदर्शन कार्यालयाची स्थापना.

Image
  केशवनगर - येथे. नवयुवक.. व युवती बेरोजगार मार्गदर्शन कार्यालयाची स्थापना. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी.  रणजीत ठाकूर ------------------------------ फेब्रुवारीला केशवनगर येथे ऋषिकेश ठाकूर व अमर वाघ यांनी नवनिर्माण नवयुवक व युवती बेरोजगार मार्गदर्शन कार्यालय ची स्थापना करण्यात आली, कार्यालयाचे उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष वाशिम श्री मनीष भाऊ डांगे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी उपस्थिती भाजपा नेते अनुपजी धोत्रे, एडवोकेट नकुल दादा देशमुख, गजानन रावजी लाटे साहेब, स्वप्निलजी सरनाईक, शंकरराव बोरकर, महादेवराव जी ठाकरे , पुरुषोत्तम तहकीक , वैभव दादा सरनाईक,  गणेश दादा हरीमकर, रमेश महाराज बाजड, सुभाष रावजी खरात, प्रशांत भाऊ गोळे, दीपक ठाकरे प्रदीप ठाकरे, दीपक भाऊ वाघ, संतोष बापू वाघ, पंजाब सोनुने, डॉक्टर दत्तात्रय देशमुख, सुदर्शन सरनाईक, सुरेश राजे जाधव, विवेक वानखेडे, शंकर भाऊ देशमुख, दत्ता भाऊ जावळे शुभम भाऊ वाजपेयी, अंकुश भाऊ वाघ, दिनेश वाघ, अभी वाघ ,sd मित्र मंडळ, इत्यादीची उपस्थिती होती

सावर्डे खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात.

Image
 सावर्डे खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कागल प्रतिनिधी कृष्णात मालवेकर ------------------------------     सावर्डे खुर्द तालुका कागल संयुक्त गावभाग मंडळाची छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती सावर्डे. मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.दिलीप मालवेकर,उप.अध्यक्ष अजिंक्य कदम व खजिनदार मा. बंबू मालवेकर यांच्या हस्ते रथातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सदरील मिरवणुकीत आकर्षक आतिषबाजी व शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. सदरील जयंती सोहळ्यात गावातील सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी झाले होते.               शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गावात भगव्या कमानी उभारण्यात येवून ध्वनिक्षेपकावरून शिवरायांचे स्पुर्ती गीते वाजविण्यात येत होती. सावर्डे खुर्द हे भगवेमय झाले होते.               मिरवणुकीत युवा उद्योजक मा.श्री. नवनाथ लिंगडे , शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख मा.दादाराव मालवेकर ,अभी मालवेकर, सुशांत मालवेकर, संयुक्त गावभागचे सर्व

वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर ( उ ) जिल्हा तर्फे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा.

Image
  वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर ( उ ) जिल्हा तर्फे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र कोल्हापूर प्रतिनिधी ----------------------------------          कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी ने जिल्हाधिकारी कार्यालय हादरून गेले.           शेतकऱ्याच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी,, केंद्र सरकारने स्थगित केलेले, काळे कायदे रद्द्द करावेत, मार्केट यार्ड मध्ये हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल घेतल्यास, संचालक वर कायदेशीर कार्यवाही करावी, इत्यादी मागण्या करिता दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार दबाव तंत्राचा चा वापर करीत आहे त्या विरोधात वंचित. बहुजन आघाडी यांनी शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून, त्यांच्या हिताकारिता लढा तीव्र करण्याचे जाहीर केले व वंचित तर्फे दिल्ली येथील आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे,            या शिवाय हातकणंगले तालुक्यातील टोप, संभापूर, शिये,व नागज फाटा येथील पुणे बेंगलोर हायवे वर रस्ता रुंदीकरणा मध्ये जमीनदोस्त करीत असलेल्या झोपडपट्टी धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण

कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा- ना.सुधीर मुनगंटीवार.

Image
  कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा- ना.सुधीर मुनगंटीवार. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  चंद्रपूर प्रतिनिधी  ------------------------------- कायदा व सुव्यवस्थेत चंद्रपूर राज्यात अग्रेसर राहावा. गाव पातळीवर पोलीस पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी. *चंद्रपूर, दि. 25*: शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित पोलीस एक्स्पो कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, शिक्षणाधिकारी(माध्य.) कल्पना चव्हा

5000, रु लाच स्वीकारताना दोघांना अटक.

Image
  5000, रु लाच स्वीकारताना दोघांना अटक. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार  -------------------------------------- जयसिंगपूर:- जयसिंगपूर येथील डवरी वसाहतीत असलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याने सदर क्षेत्र फळ दुरुस्त करून सातबारा उतारा देण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी सजा जयसिंगपूर तालुका शिरोळ जि कोल्हापूर वर्ग 03 रा रुकडी तालुका हातकणंगले स्वप्नील वसंत राव घाटगे व.व.39 व महसुल सहाय्यक तहसीलदार कार्यालय शिरोळ वर्ग 03 लोकसेवक राजू नायकवडी या दोघांना 27500 रुपये लाच मागितली त्यापैकी 5000 रु लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले हि कारवाई पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला.स पो फौ प्रकाश भंडारे,पो हे काॅ. अजय चव्हाण, विकास माने,पो ना सुधीर पाटील सचिन पाटील पो काॅ संदिप पवार चालक सूरज अपराध यांनी केली

वंचित बहुजन आघाडीकडून 06मार्च रोजी सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन.

Image
  वंचित बहुजन आघाडीकडून 06मार्च रोजी सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  नवी मुंबई प्रतिनिधी  रवि पी ढवळे सर --------------------------- वाशी :- वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई कडून दिनांक सहा (06)मार्च रोजी सत्ता परिवर्तन महासभेच्या आयोजन करण्यात आले आहे. या सभेला प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत.त्यानिमित्ताने आज वाशी येथील अशोका  हॉलमध्ये येथे  बैठक घेण्यात आली  घेण्यात आली. यावेळी नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी पनवेल शहरातील पदाधिकारी  व  कार्यकर्ते नवी मुंबईतील दोन्ही तालुक्यातील आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोह्यातील महापुरुषांच्या पुतळा अनावरण फलकावरील नावे काढून शासन नियमानुसार फलक लावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू - एकनाथ पवार यांचा इशारा.

Image
  लोह्यातील महापुरुषांच्या पुतळा अनावरण फलकावरील नावे काढून शासन नियमानुसार फलक लावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू - एकनाथ पवार यांचा इशारा. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधि  अंबादास पवार  ------------------------------  लोहा शहरातील शिवप्रेमींची मागील अनेक वर्षापासूनची शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची मागणी होती. अनेकांनी विविध मार्गाने आंदोलन करून लढा दिला. त्यानंतर शहरातील मुख्य चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. तसेच पालिका प्रांगणात महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारला. परंतु त्याठिकाणी लावण्यात आलेले अनावरण फलक हे शासन नियमानुसार न लावता नांदेडच्या खासदाराने स्वतःच्या कुटुंबातील नावे असलेले फलक लावण्यात आले. सदरील फलक तत्काळ हटविण्यात येवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा (उबाठा) शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी दिला आहे.   लोहा शहर परिसरातील शिवप्रेमींनी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून उभारण्यासाठी घेवून जाताना प्रशासनाच्या मार्फत तो अडविण्य

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे विभागीय नाट्यसंमेलन चे . मा ना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभ हस्ते महाबळेश्वर येथे उद्घाटन.

Image
  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे विभागीय नाट्यसंमेलन चे . मा ना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभ हस्ते महाबळेश्वर येथे उद्घाटन. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र मेढा प्रतिनिधी   प्रमोद पंडीत -----------------------------------  महाबळेश्वर येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे विभागीय नाट्यसंमेलन चे . मा ना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभ हस्ते महाबळेश्वर येथे उद्घाटन केले.यावेळी मा ना शंभूराज देसाई, मा आ मकरंद पाटील,नाट्य परिषद चे अध्यक्ष प्रशांतजी दामले, माजी अध्यक्ष मोहनजी जोशी,संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल,सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडिजी आणि महाबळेश्वर मधील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.आज झालेला नाट्य परिषद 100बा विभागीय नाट्यसंमेलन म्हणजे एक रेकॉर्ड निर्माण केले आहे असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.  महाबळेश्वर मधील 2000सीट चे नाट्यगृह लवकरात लवकर चालू करण्याची सूचना केली व त्यासाठी निधी डीपीडीसी मधून उपलब्ध करावा अशी सूचना शंभूराज देसाई याना केली.यामुळे महाबळेश्वर येथील रसिकांना याचा लाभ होण

पक्ष प्रवेश : बिभवी आणि वाळंज वाडी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे शिवसेना शिंदे पक्षात पक्षांतर.

Image
  पक्ष प्रवेश : बिभवी आणि वाळंज वाडी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे शिवसेना शिंदे पक्षात पक्षांतर. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र मेढा प्रतिनिधी   प्रमोद पंडीत ----------------------------- मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावरती प्रभावित होऊन बिभवी आणि वाळजवाडी ग्रामपंचायतीचा बोंडारवाडी धरणाकरिता व गावच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सातारा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महाबळेश्वर येथे शंभर व्या विभागीय नाट्य परिषदेच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आले होते त्यावेळी वरील प्रवेश झाले त्यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथजी ओंबळे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार तालुकाप्रमुख शांताराम कदम समीर गोळे वैद्यकीय मदत पेक्षा सातारा समन्वयक

यशाचा शॉर्टकट नसतो : संजय साबळे.

Image
  यशाचा शॉर्टकट नसतो : संजय साबळे. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  चंदगड प्रतिनिधी आशिष पाटील -------------------------- तिलारी (चंदगड ) "ज्याचा वर्तमान काळ आखीव असतो त्याचा भविष्यकाळ रेखीव असतो आयुष्यात सावकाश चाला हरकत नाही पण चालनाना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मनमिळावू स्वभावाची आत्मीक समाधान लाभलेल्या मनाची आणि दैदिप्यमान यशाची पावले सदैव मागे उमटली पाहिजे . यासाठी दैनंदिन जीवनातून सात्वीक विचार , कृती घडणे आवश्यक आहे . *यशाला शॉर्टकट नसतो* . प्रयत्न हेच त्याच्यावर औषध आहे " असे प्रतिपादन दि न्यू इंग्लिश स्कूल चे अध्यापक संजय साबळे यांनी केले . ते माऊली विद्यालय तिलारी येथील दहावी विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक केले . मुख्याध्यापक एम . पी .काटकर यांनी प्रास्ताविक केले .पाहुण्यांचा परिचय विठ्ठल बेनके यांनी करून दिला . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कोदाळीच्या . सरपंच योगिनी दळवी होत्या . यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांची मनोगते झाली .यावेळी माजी मुख्याध्यापक सातर्डेकर , ला

महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीमधील वेण्णा लेक, लायब्ररी रिन्यूशनच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा : किरण बगाडे.

Image
  महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीमधील वेण्णा लेक, लायब्ररी रिन्यूशनच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा : किरण बगाडे. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा प्रतिनिधी सुर्यकांत जाधव  -------------------------------- मा.चंद्रकांत पूलकुंडवार सो विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची मागणी.  उपरोक्त वरील विषयानुसार महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये अनेक विकास कामे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करण्यात आली शासनाचा भरघोस निधी मिळूनही वेण्णालेक तलाव विकासासाठी तसेच आजाखेर कितीनिधी वेण्णा लेक विकासासाठी तसेच देखभाल दुरुस्ती करण्यासाठी किती खर्च केला याचा खुलासा करावा तसेच वेण्णा लेक तलावाचे तसेच लायब्ररी रिन्यूशन च्या कामात दर्जाहीन मटेरिअल वापरल्याने सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित पर्यटन विभागाचा निधीचा गैरवापर तत्कालीन मुख्याधिकारी पल्लवी पाटील व सध्याचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संपूर्ण विकास कामाची SQM वरीष्ठ समिती गठीत करून अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी महाबळेश्वर नगरपालिकेतील कार्यालयामध्ये एकाच टेबलावर आर्थि

शिव्या का देता असं विचारल्यावर एका गरोदर महिलेसह पाच जणांना मारहाण.मनेरमाळ येथील प्रकार.

Image
  शिव्या का देता असं विचारल्यावर एका गरोदर महिलेसह पाच जणांना मारहाण.मनेरमाळ येथील प्रकार. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------- उंचगाव पैकीं मनेरमाळ येथे असलेल्या ओंकार कॉलनी हसिना पापालाल नदाफ दोन मुलीसह राहतात हसिना नदाफ यांचा नातजावाई इलियास सोलापुरे आपली पत्नी नाजीया सोलापुरे यांच्या साठी औषध घेऊन आला होता तो संध्याकाळी 7 वाजता हसिना नदाफ यांच्या दारात असलेल्या कठड्यावर बसला होता त्यावेळीं घरासमोर राहणारे रवी वरुटे टुव्हिलर गाडीवरुन येत असताना कठड्यावर बसलेल्या इलियास सोलापुरे यांच्या अंगावर सांडपाणी मुद्दाम उडवलं म्हणून इलियास सोलापुरे यांच्या आजी सासू हसीना नदाफ यांनी रवी वरुटे यास सांडपाणी अंगावर का उडवलेस अशी विचारणा केली असता रवी वरुटे यांनी हसिना नदाफ यांना अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता कठड्यावर बसलेले नातजावाई इलियास सोलापुरे याने शिवीगाळ का केली? अशी विचारणा केली असता रवी वरुटे,दिपा वरुटे या पती पत्नी यांनी मिळून नात जावई इलियास सोलापूरे याच्या उजव्या हातावर व हसीना नदाफ या

राज्यात गुणवत्ता आणि कक्षाची स्थापना, माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षपदी.

Image
  राज्यात गुणवत्ता आणि कक्षाची स्थापना, माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षपदी. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  अमरावती प्रतिनिधी पुंडलिक देशमुख  --------------------------------- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच निरीक्षण पद्धत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या अध्यक्षपदी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचे सबलीकरन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या यशस्वीतेमुळे उच्च शिक्षणाची गुणवत्ता व पाया यांचे सबलीकरण करण्यासाठी एक छत्री योजना अभियान स्वरूपात राबविण्याकरता केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान ही योजना १२व्या व१३व्या पंचवार्षिक योजने पासून राबविण्यात येत आहे. उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्व दूर संधी व समानता यावी यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्च प्रशिक्षण अभियानाची राज्या

ग्रामदैवत पाडळेश्वराची यात्रा जावळीत प्रथमच श्वान शर्यत स्पर्धा.

Image
ग्रामदैवत पाडळेश्वराची यात्रा जावळीत प्रथमच श्वान शर्यत स्पर्धा. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र मेढा प्रतिनिधी प्रमोद पंडीत  ------------------------------------- सातारा पासून अवध्या १८ किमी अंतरावर सह्याद्रिच्या कुशीत वसलेले आणि निर्सग सौन्दर्या बरोबर ऐतिहासिक वारसा लाभलेले असे ठिकाण सातारा - मेढा - महाबळेश्वर रोडवर कण्हेर धरणाच्या ८ किमी अंतरावर भारताचा नैसर्गिक नकाशाचे प्रतिभिंम लाभलेले गाव - भणंग निसर्ग सौन्दर्या बरोबर ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण मेरूलिंगचा महादेवाचा धाकटा भाऊ "श्रीपाडळेश्वर " म्हणून पंचक्रोशित भक्तांचा नवसाला पावणारा देव भक्तांचा संकटात धाऊन येणारा देव " श्री पाडळेश्वर " भणंग गावचे ग्रामदैवत " श्री पाडळेश्वर ग्रामदैवत श्री पाडळेश्वराची यात्रा माद्य कृ . ५ गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ ते माघ कृ ६ शुक्रवार दिनांक ०१ मार्च २०२४ रोजी भरत आहे . यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक २९ /02/20 २४ रोजी जागर व रात्री छबीना आणि श्री पाडळेश्वराची पालखीतून भव्य दिव्य अशी ढोल लेझीमच्या गजरात चालणारी मिरवणूक व लोक नाट

परिश्रमानेच उज्जवल यश मिळविता येते पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर.

Image
  परिश्रमानेच उज्जवल यश मिळविता येते पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधि  अंबादास पवार  --------------------------  सद्यस्थितीत प्रचंड स्पर्धा आहे.या स्पर्धेत टिकायचे असेल तर मेहनत जिद्द असायला पाहिजे.वास्तवाची जाणीव आपणास असायला पाहिजे.विद्यार्थ्यांनो परिश्रमाने उज्जवल यश मिळविता येते असे मार्गदर्शन लोहा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले. ते शिवछत्रपती विद्यालयात इयता दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी ते बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे होते.यावेळी व्यासपीठावर एमपीएससी उत्तीर्ण झालेले आविनाश मोरे, प्रसिद्ध निवेदक बालाजी गवाले,क्रीडा शिक्षक दिलीप काहलेकर, आर. आर पिठ्ठलवाड, हरिहर धुतमल उपस्थित होते. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपण दहावीला दोन वेळेस नापास झालो, पण पुढे अभ्यासात नेहमीच अव्वल राहिलो आहे.ते सांगताना त्यांनी तीन विषयात पदव्युत्तर असून कायदाची पदवी धारण केली पण हे करताना परिश्रम व

मरळी व शिरगाव ता.कराड मधील शासनाच्या महसूल ला चुना लावणाऱ्या वर कारवाई करून क्रशर खाण तात्काळ बंद करा:किरण बगाडे.

Image
 मरळी व शिरगाव ता.कराड मधील शासनाच्या महसूल ला चुना लावणाऱ्या वर कारवाई करून क्रशर खाण तात्काळ बंद करा:किरण बगाडे. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा प्रतिनिधी सुर्यकांत जाधव  ----------------------------- मा. चद्रकांत पुलकुंडवार सो विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची  मागणी. वरील उपरोक्त विषयांवरून मरळी, शिरगाव ता.कराड मधील सर्वे नंबर 141 आणि मरळी मधील सर्व्हे नंबर 327 (तानाजी प्रल्हाद माने) तसेच 327 (क) मध्ये अनधिकृत व बेकायदेशीर रित्या महामार्गासाठी मुरूम उत्खनन सुरू आहे तरी या उत्खननाला शासनाचे कोणतीही परवानगी नाही तसेच शासनाला किती महसूल जमा केला याचाही खुळा करावा तसेच मरळी या गावांमध्येही अनधिकृत व बेकायदेशीर त्या उत्खनन सुरू आहेप्रशासन  कारवाई करत नाही त्यामूळे सामन्याने एक न्याय आणि धनदांडग्यांना एक न्याय अशा मुजोरांना  कितिफिवास पाठीशी घालणार त्यामुळे आसपासच्या नागरिकांना याचा त्रास होत असून आरोग्याशी व  जिविताशी खेळणाऱ्या शिरगाव व मरळी मधील क्रशर धारकांवर कारवाई करून क्रशर खान तात्काळ बंद करावे क्रशर धुळफेक आंदोलन करणार असा इ

शरीर सुखाची मागणी करणाऱ्यास गांधीनगर पोलिसांनी घेतल ताब्यात.

Image
  शरीर सुखाची मागणी करणाऱ्यास गांधीनगर पोलिसांनी घेतल ताब्यात. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ----------------------------- गांधीनगर :गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील महिलेला व्हाट्सअपवर मेसेज पाठवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व शरीरसुखाची मागणी केल्याबद्दल प्रेम पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद पिडीत महिलेने दिल्यावर गांधीनगर पोलिसांनी प्रेम पाटील यास ताब्यात घेऊन त्यांच्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे

मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे हस्ते गुन्हयातील तक्रारदारांना त्यांचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिणे हस्तांतरीत.

Image
 मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे हस्ते गुन्हयातील तक्रारदारांना त्यांचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिणे हस्तांतरीत. --------------------‐------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी  अमर इंदलकर.  ---------------------------------------     मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी दि.२१/०२/२०२४ ते दि.२४/०२/२०२४ या कालावधीत सातारा जिल्हा पोलीस दलाचा वार्षिक तपासणी कार्यक्रम आयोजित केला असून त्याकरीता ते सातारा जिल्हयामध्ये हजर आहेत.        श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण १६३ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ४४२ तोळे सोने (४ किलो ४२० ग्रॅम) असा एकू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठिकपुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आरोग्य सेवक यांचे सामाजिक उत्तरदायित्व सन्मान सोहळा पार पडला.

Image
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठिकपुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आरोग्य सेवक यांचे सामाजिक उत्तरदायित्व सन्मान सोहळा पार पडला. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------- राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे दूषित पिण्याच्या पाण्यामुळे, कावीळ आजाराचा प्रसार झाला होता, ठिकपुर्ली प्राथमिक आरोग्य विभागाच्या व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नांना यश, हा कावीळ आजार व प्रसार आटोक्यात आणला बद्दल या आरोग्य प्रतिनिधींचे व सरपंच, सदस्य व स्थानिक नागरिकांचे मा. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश दादा चौगुले, राधानगरी विधानसभा संघटक नरेंद्र जायले यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व या प्रमाणे काम केल्याबद्दल राधानगरी आरोग्य अधिकारी डॉ आर. आर शेट्टी, ठिकपुर्ली प्राथमिक केंद्राचे मुख्य डॉक्टर अंजू सिंग, डॉ रूपाली गायकवाड, आरोग्य सेवक अधिकारी रवींद्र परीट, नर्स कर्मचारी यांच्या कामाचा गौरव करून त्यांना पुष्पगुच्छ, शाल व सन्मानपत्र मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज येडूरे य

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको.

Image
  भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको.  --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकूर ---------------------------    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. 20 रोज मंगळवार ला आमरण उपोषण सुरू झाले असून आज अमरण उपोषण चैथ्या दिवसात पोचले आहे. बहुप्रतीक्षित नदीजोड प्रकल्पातून वाशिम जिल्हा वगळण्यात आला. गेल्या आनेक वर्षापासून प्रतीक्षा आसणार्या नदीजोड प्रकल्पाचा आराखडा समोर आला त्यामध्ये वाशिम जिल्हयाचा कुठेही समावेश नाही. शासनाने वाशिम जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधीं आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर व जिल्हाअध्यक्ष रामेश्वर आवचार हे आमरण उपोषणास बसले आहेत. शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देणार्या रोही, हरीण, वानर, रानडुक्कर याच्यां बंदोबस्तासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. सोयाबीनची नाफेड द्वारा खरेदी करण्यात यावी. अग्रीम पीकविमाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा. शेतकऱ्यांना कृषी पंपाला मोफत व मुबलक वीज मिळावी. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबाला मिळणार्या घरकुल अनुदानात दुप्पट वाढ करावी व जागेचा प्

केशवनगर येथे दहा लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न.

Image
  केशवनगर येथे दहा लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजीत  ठाकूर  ------------------------------ रिसोड तालुक्यातील रिसोड मालेगाव रोडवरील ग्रामपंचायत केशवनगर येथे काल दिनांक २२/२/२०२४ रोजी दुपारी चार वाजता पंचवीस पंधरा अंतर्गत दहा लाख रुपयांच्या रस्त्याचाभूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला ,या कामाचे उद्घाटन भाजपाचे रिसोड मालेगाव निवडणूक प्रमुख नकुलदादा देशमुख यांच्या हस्ते पार पडले यावेळी मान्यवरांनी कुदळ मारून रस्त्याच्या भूमिपूजनाच्या शुभारंभ पार पडला ,त्यानंतर ग्रामपंचायत केशवनगर व गावकऱ्यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवनगर येथील ग्रामपंचायत पॅनलचे अध्यक्ष श्री शिवाजीराव सरनाईक होते, यावेळी उद्घाटक नकुल दादा देशमुख यांचा व मान्यवरांचा ग्रामपंचायत च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचे वाशिम जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे ,रिसोड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषराव खरात ,गोवर्धन ज

कुपवाड मधील सामाजिक कार्यकर्ता दादासो कोळेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाची कुपवाड शहर युवक अध्यक्ष.

Image
  कुपवाड मधील सामाजिक कार्यकर्ता दादासो कोळेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाची कुपवाड शहर युवक अध्यक्ष. ---------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  बामणोली कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम   ---------------------------------------- ॲड ‌. अमित शिंदे शहर जिल्हा राष्ट्रवादी व काँग्रेस अध्यक्ष व व जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड शहर युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे    दादासो कोळेकर सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम केले आहेत त्यांच्यात नेतृत्व गुण असल्याने त्यांच्याकडे त्यांचा चहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी संजय साळुंखे समीर मुल्ला सोपान खरात लक्ष्मण स्वतः दादासाहेब  ओलेकर सुभाष पाटील   बाबासाहेब सरगर आप्पा शेळके प्रकाश गायकवाड  आधी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते...

सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारूची विक्री करणाऱ्या ०३ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी केले दोन वर्षांकरिता तडीपार.

Image
  सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारूची विक्री करणाऱ्या ०३ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी केले दोन वर्षांकरिता तडीपार. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी अमर इंदलकर  ----------------------------         सातारा जिल्हयामध्ये सातारा तालुक्यातील बोरगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने अवैद्य दारुची विक्री शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) शकीला गुलाब मुलाणी, वय ६० वर्षे, २) अमीर गुलाब मुलाणी, वय ३७ वर्षे, ३) समीर गुलाब मुलाणी, वय ३३ वर्षे, सर्व रा. टिटवेवाडी (देशमुखनगर) ता. जि. सातारा यांचेवर दुखापत पोचवून शिवीगाळ दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैद्य दारुची चोरटी विक्री करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गर्दी मारामारी करणेबाबतचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.आर, जी. तेलतुंबडे, सहा. पोलीस निरीक्षक, बोरगांच पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक साता