एन.एस.एस. मधून विद्यार्थी घडतात मा. वैभव पवार.
एन.एस.एस. मधून विद्यार्थी घडतात मा. वैभव पवार.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
-------------------------
वाई दि. ०८ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजते. मुलांबरोबर मुलीही यात सहभाग घेऊन श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देतात. एन.एस.एस. मधून विद्यार्थी घडतात असे प्रतिपादन नायब तहसिलदार मा. वैभव पवार यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. भानुदास आगेडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी सरपंच रेखा जगताप, एन.एस.एसचे सल्लागार डॉ. चंद्रकांत कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, मुख्याध्यापक संजय कुंभार, प्रमोद डेरे, कॅ.डॉ. समीर पवार, डॉ. शिवाजी कांबळे यांची उपस्थिती होती.
मा. पवार म्हणाले, या शिबिरामध्ये विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आजच्या या रणरागिणी मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात हे या शिबिरात त्या दाखवून देतील. विद्यार्थ्यांनी गावात विधायक काम करावे. ग्रामीण जीवन जाणून घ्यावे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. आगेडकर म्हणाले आमचे विद्यार्थी गावकऱ्यांच्या सादाला प्रतिसाद देतील, शेंदुरजणे हे गाव सधन आहे. गावाला उज्ज्वल परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी गावातील लोकांशी सुसंवाद साधवा.
डॉ. चंद्रकांत कांबळे, ग्रामस्थ सुरेश जगताप व संजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमास रामदास सूर्यवंशी, डॉ. प्रेमा यादव, संतोष मुळीक, चेतन तावरे, सुनील दगडे व एन.एस.एस.चे स्वयंसेवक यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment