Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभा रिसोड तालुक्याच्या वतिने 'ईव्हीएम हाटवा देश वाचवा.

 भारतीय बौद्ध महासभा रिसोड तालुक्याच्या वतिने 'ईव्हीएम हाटवा देश वाचवा. 

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड. प्रतिनिधी

रणजीत.ठाकूर 

--------------------------------

 येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या व ईव्हीएम हद्दपार करावा यासाठी तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर मॅडम यांच्या मार्फत मा. राष्ट्रपती भारत सरकार नव्वी दिल्ली २) मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली ३)मा. निवडणूक आयोग भारत सरकार दिल्ली ,

अलिकडे ईव्हीएम संबंधित भारतीय जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून. आपण ईव्हीएम द्ववारे दिलेले मत त्याच प्रतिनिधीला मिळाले की नाही. याबाबत शंका अधिक दृढ होत चालली आहे.व त्या प्रकारचे ईव्हीएम बाबतचे वातावरण संपूर्ण देशात दिसत आहे.ही लोकशाही प्रजासत्ताक देशासाठी घातक असल्यामुळे स्वच्छ व निष्पक्ष वातावरणात सन२०२४ ची व पुढील निवडणुका घेण्यासाठी , ईव्हीएम हाटाव देश बचाव' यासाठी निवेदन देण्यात आले.यावर योग्य विचार होऊन मतपत्रिका द्ववारे (बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यासाठी हे निवेदन सविनय सादर करण्यात येत आहे,हे निवेदन शालिग्राम पठाडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रिसोड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

निवेदन देताना व निवेदनावर सह्या,रामजी बानकर तालुका उपाध्यक्ष , देविदास सोनुने तालुका सचिव . माधव हिवाळे तालुका कोषाध्यक्ष अभिमन्यू पंडित, साहेबराव नवघरे, संध्याताई पंडित जिल्हा अध्यक्षा.मिनाताई चव्हाण, महानंदाताई वाठोरे महिला तालुका अध्यक्ष. अॅड.शरद मोरे, अँड.एस.डी.इंगोले,अॅड.डी.टी.मोरे,अॅड.सतिष पंडित, मधुकर मोरे , शोभा मोरे,प्रकाश डुकरे उज्वला धांडे, रेणुका धांडे, शामराव मोरे, गणेश कवडे. वनिता अंभोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत , प्रतिक्रिया:- जगभरातील प्रगत राष्ट्राने बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे चालू केले आहे आणि भारत देशात बॅलेट बंद करून निवडणूक आयोगाने ईव्हीएम चालू केल्या त्यामुळे नक्कीच निवडणूक पारदर्शक होणार नाहीत याकडे निवडणूक आयोगाने लक्ष घालून येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. शालिग्रामजी पठाडे भारतीय बौद्ध महासभा रिसोड तालुका अध्यक्ष,

Post a Comment

0 Comments