डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
----------------------------------
फ्रंट लाईन न्युज महारष्ट्र
दिघा प्रतिनिधी
----------------------------------
दिघा :- विष्णु नगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रवि पी.ढवळे सर उपस्थित होते. जय बजरंग तरूण मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर वातावरण सुंगधीत विशाल बागल यांनी केले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी, युवक उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने ज्ञानेश्वर नारायणकर, उल्हास काळे,
उपस्थित होते. उपस्थित असलेल्या लोकांना प्रमुख अतिथी रवि पी.ढवळे सरांनी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. त्यांनी मंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या अभ्यासकीचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गजानन घोरपडे यांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment