Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनी जिल्हा बँक करणार ३० शहीद जवानांच्या आई, पत्नीचा सन्मान.

 प्रजासत्ताक दिनी जिल्हा बँक करणार ३० शहीद जवानांच्या आई, पत्नीचा सन्मान.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पी एन देशमुख

अमरावती प्रतिनिधी

----------------------------------

अमरावती.

प्रजासत्ताक दिनाचे (२६ जानेवारी) अवचित्त साधून येथील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत देशाकरिता शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता तसेच शौर्य पदक प्राप्त जवानांचा सत्कार केला जाणार आहे. यामध्ये २१ वीर माता, वीर पत्नीसह ४ जवानांचा समावेश आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची नेहान करण्यासाठी बँकेने स्वातंत्र्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल हेही उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना ढेपे म्हणाले, शहीद जवान तसेच शौर्य दाखवणाऱ्या जवानांना प्रति अभिव्यक्त होण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पने हा विषय पुढे आला असून विरोधी सदस्यांचा अपवाद वगळता कार्यकारी परिषदेने त्याला रीतशीर परवानगी ही दिली आहे. त्यांच्या मते बँकेचा कारभार हाती घेतल्यानंतर गेल्या सहा महिन्यात आम्ही (अध्यक्ष उपाध्यक्ष व सहकारी संचालक) शेतकरी हिताच्या अनेक योजना लागू केल्या. याशिवाय विविध उपक्रमा सह सामाजिक उपक्रम देखील सुरू केले ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच शहीद जवानांच्या वीर पत्नीचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशाकरिता शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ त्यांच्या वीर पत्नी, वीर माता यांचे पूजन करून त्यांना साडी चोळी व शाही भोजन देण्याचा निर्णय घेतला आहे.२६जानेवारीला सकाळी झेंडावंदन करून७ वाजता बँकेच्या परिसरात अध्यक्ष आमदार बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजीत ढेपे तसेच संचालक मंडळ व जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी देशभक्तीवर गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्याला सर्व संबंधित उपस्थित राहावे असे आवाहनही अभिजीत ढेपे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments