शिरगाव येथे युवकाचा बांधावरून वैरणीचा भारा घेऊन पडल्याने मृत्यू !

 शिरगाव येथे युवकाचा बांधावरून वैरणीचा भारा घेऊन पडल्याने मृत्यू !

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

--------------------------------

      राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथील विजय बळवंत येरुडकर ( वय ४ २ ) या युवकाचा वैरणीचा भारा घेऊन बांधावरून पडल्याने जागीच मृत्यू झाला . या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की विजय येरुडकर पहाटे बुरंबाळी फाटा येथे गुरांना वैरण ( उसाचे वाडे ) आणण्यासाठी गेले होते. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वैरणीचा भारा घेऊन येत असताना अंधारात ते बांधावरून पाय घसरून भारा घेऊन खाली पडले . त्यांना बेशुध्द अवस्थेत नातेवाईकांनी गावातील खाजगी दवाखान्यात आणले . यावेळी डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर  राधानगरी येथील ग्रामीण शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी १ वाजता त्यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . मनमिळवू ' शांत स्वभाव , असणाऱ्या , विजय यांच्या अकाली मृत्यूने गाf,वात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई , वडील , पत्नी , एक मुलगा , एक मुलगी , भाऊ असा परिवार आहे . कृष्णात येरुडकर यांचे ते जेष्ठ बंधू होत. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. १२ रोजी आहे.


Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.